वाशीम (वृत्तसंस्था) एस.टी.ने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समध्ये हात घालून मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न महिलेच्या सतर्कतेमुळे फसला. ही टना २० जूनला दुपारी कारंजा बसस्थानकावर घडली.
एस.टी.ने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समध्ये हात घालून तीन महिला मंगळसूत्र चोरीच्या प्रयत्नात होत्या. परंतू संबधित महिला सतर्क झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस कारंजा बसस्थानकावर दाखल झाले. पोलिसांनी मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले. परंतु ज्या महिलेच्या पर्समध्ये हात घालून मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला, त्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिला.
पोलिसांनी तरीही महिला संशयित असल्याने त्यांच्यावर कलम १०९ नुसार कारवाई करीत इतर पोलिस स्टेशनमध्ये सदर महिलांविरोधात कोणते गुन्हे दाखल आहेत का ? या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरु केले आहे. ज्योती काशीनाथ मानकर (३०), नयना एकनाथ मानकर (२७) व प्रीती रितिक हातागडे (२५, रा. रामटेके नगर, नागपूर) अशी महिलांची नावे आहेत.