भंडारा (वृत्तसंस्था) खासगी कंपनीत कार्यरत असताना पदोन्नती मिळाल्याने सिहोरा गावात छोटेखानी कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हरदोली येथील रवींद्र पांडुरंग कटरे (३५) रा. हरदोली (सि.) या तरुणाने हजेरी लावली. रात्री कार्यक्रम आटोपल्यावर कटरे देखील आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले. परंतू घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात रवींद्र कटरे यांचा जागीच मृत्यू झाला.
खासगी कंपनीत कार्यरत असताना पदोन्नती मिळाल्याने सिहोरा गावात शनिवारी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हरदोली येथील रवींद्र पांडुरंग कटरे यांनी देखील हजेरी लावली होती. कार्यक्रम आटोपल्यावर रात्री १ वाजेच्या सुमारास रवींद्र कटरे स्वतःच्या चारचाकीने (क्रमांक एमएच ३६ एफ ०२८२) घराकडे जाण्यासाठी निघाले. परंतू राष्ट्रीय महामार्गावरील रनेरा ( डाग बंगला) गावाच्या वळणावर येताच त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कारने एका विजेच्या खांबानजीक सिमेंट ओट्याला धडक देत कार पलटली.
तर दुसरीकडे कार्यक्रम संपून बराच वेळ होऊनही मोठा भाऊ रवींद्र कटरे हे घरी परत का आले नाही?, या चिंतेने लहान भाऊ डॉ. गौरव कटरे हे सिहोराच्या दिशेने निघाले. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर त्यांना रनेरा गावाच्या वळणावर मोठे बंधू रवींद्र यांची कार अपघातग्रस्त झाल्याचे दिसून आले. डॉ. गौरव कटरे यांनी लागलीच गावकऱ्यांना माहिती दिली. गावकरी मदतीला धावून आल्यानंतर जखमी रवींद्रला उपचारासाठी तुमसरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रवींद्र कटरे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वळणावरून अवघ्या ५०० मीटर अंतरावर घर असूनही रवींद्र घरी पोहचू शकले नाहीत.