धरणगाव (प्रतिनिधी) येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय एरंडोल येथे कार्यरत असलेले व संतोष शामु सूर्यवंशी निवृत्त जकात निरीक्षक धरणगाव नगरपालिका यांचे चिरंजीव प्रा. योगेश संतोष सुर्यवंशी यांना कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे रसायनशास्त्र या विषयात डॉक्टर पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना रसायनशास्त्र विषयातील तज्ञ गाईड प्रा. डॉक्टर एन.जी. शिंपी, प्रभारी प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील, आर. एल. कॉलेज, पारोळा, डॉ.शारदा सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, प्रभारी प्राचार्य एन.ए.पाटील, प्रा.आर. एस. पाटील, पर्यवेक्षक प्रा एन. बी. गायकवाड, प्रा. जे.व्ही. पाटील, प्रा.व्ही. एस. वाघ, प्रा. एस.ए. राणे यांचे सहकार्य लाभले.