TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाबासाहेबांनी संविधानातून समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा ; शहरातून निघाली जागर रॅली

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. याच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना समतेचा आणि समान न्यायाचा अधिकार दिला. संविधान आहे, म्हणून आज आपण आहोत. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाने आखून दिलेल्या विचारांवरून चालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. संविधान जागर समितीतर्फे संविधान दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

 

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

संविधान जागर समितीतर्फे आज संविधान दिनाचे औचित्य साधून शहरातील रेल्वे स्थानका जवळ असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री सुनील महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, माजी महापौर सीमा भोळे, मुकुंद सपकाळे, फारूक शेख, माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादीचे एजाज मलीक, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, अमोल कोल्हे, माजी पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांचे पुष्प गुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. मुकुंद सपकाळे यांनी प्रास्ताविकातून संविधान दिनाची महत्ता व्यक्त केली.

 

पालकमंत्री म्हणाले की, संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही. तर देशातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी याची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस चाललेला हा संघर्ष संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केले. सर्वांना न्याय देण्याचे काम संविधानाने केले आहे. आम्ही ओबीसी नसतो तर आज या व्यासपीठावर नसतो. अलीकडच्या काळात संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली जाते, मात्र देशातील दलीत, ओबीसी, आदिवासी आदींच्या एकत्रीत संख्येमुळे असे काहीही शक्य नाही. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आजही संविधानाच्या नियमाच्या बाहेर कुणाला जात येत नाही. आम्ही गाडीत बसलो असलो तरी या गाडीचे स्टीअरिंग हे बाबासाहेबांच्या (संविधानात) हातात आहे. आता अनेक जण गणपती पाण्यात बुडवून सत्ता बदल होण्याची अपेक्षा करत असले तरी तसे होणार नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला. तर, संविधान दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी संविधानाच्या मार्गावरून चालण्याची तसेच कोणत्याही बाबीची पडताळणी केल्याशिवाय याला सत्य न मानण्याचा संकल्प घेतला पाहिजे असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले. तर देशात इतक्या जाती-धर्म असले तरी आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, आणि यानुसारच आपण वागले पाहिजे असे आपल्याला संविधान सांगते. आणि याचे पालन करणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

 

या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हरीचंद्र तायडे यांनी करून आभार प्रदर्शन केले. दरम्यान, या कार्यक्रमानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संविधान जागर रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद, टॉवर चौक मार्गे जुन्या बस स्थानक परिसरात आली. येथून तायडे गल्ली मार्गे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संविधानाचा जयजयकार करणार्‍या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

February 23, 2022

मध्यरात्रीच्या सुमारास म्हसावद येथे चोरट्यांची हातसफाई

August 24, 2025

तेलंगणात माजी तहसीलदाराची कारागृहात आत्महत्या

October 15, 2020

NASA Astronauts Install High-Definition Cameras During Spacewalk

July 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group