जळगाव (प्रतिनिधी) सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. जानेवारी २०२२ ते जून २०२२ या काळातील १५ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
जानेवारी २०२२ ते जून २०२२ या काळातील १५ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात धरणगाव आणि जळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील २०२० मधील एका पोस्कोच्या दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. धरणगावच्या गुन्ह्यात सपोनि हनुमंत गायकवाड, पो.नी.विलास पाटील आणि स.फौ. देविदास कोळी यांनी सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचवले. पोलीस अधिकारी श्री. गायकवाड यांना २० हजार तर पोलीस कर्मचारी श्री. पाटील आणि कोळी यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये बक्षीस जाहीर झाले आहेत. दुसरीकडे जळगाव तालुका पोलीस स्थानकातील २०२० मधील पोस्कोच्या गुन्ह्यात रोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस हवलदार राजधर मराठे, स. फौजदार तुषार मिस्त्री यांचा देखील समावेश आहे. श्री. सोनवणे यांना १३ हजार तर श्री. मराठे आणि मिस्त्री यांना अनुक्रमे ७ व ५ हजाराचे बक्षीस जाहीर झाले आहे.