भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेल्या विवाहितेवर दोघांनी बलात्कार तर तिसऱ्याचे अश्लील व्हिडीओ दाखवून गैरकृत्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी २०२२ ते दि. १३ मार्च २०२२ चे दरम्यान वेळोवेळी सुधाकर वामन देवरे व मिलिंद स्वरूपचंद पाटील यांनी २३ वर्षीय विवाहित महिलेशी शारीरिक संबंध केले. तर महेश उर्फ पुरुषोत्तम सुधाकर देवरे याने महिलेस त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तसे कृत्य करायला लावले. तसेच सुधाकर वामन देवरे, मिलिंद स्वरूपचंद पाटील, महेश उर्फ पुरुषोत्तम सुधाकर देवरे (सर्व. रा. नाशिक), सुभाष रामजी पाटील (रा.गोरेगाव) याच्यासह तिघं महिलांनी विवाहितेस तसे कृत्य तू कर त्याबाबत तुझे वडिलांना पैसे मिळतील, असे सांगितले. तसेच पिडीत विवाहितेच्या वडिलांनी लग्नात कमी हुंडा दिला व गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे घेऊन ये असे बोलून पिडीतेचा छळ केला. एवढेच नव्हे तर पिडीत विवाहितेस लाता बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी भडगाव पोलिस स्थानकात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोऊनि गणेश वाघमारे हे करीत आहेत.
















