धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील अनोरे गृप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी भगवान आसाराम महाजन यांची तर मीनाताई ज्ञानदेव पाटील यांची व्हाय चेअरमन पदी सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर होऊन अनोरे विकास सोसायटी च्या कार्यालयात ७ में रोजी बैठक संपन्न झाली. त्यात सर्वानुमते पदाधिकारी ची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवड प्रसंगी अनोरे सरपंच स्वप्निल महाजन, हरी महाजन, मधुकर देशमुख, अधिकार पाटील, माजी सरपंच रमेश महाजन, सेक्रेटरी अनिल चौधरी, शिपाई अंकुश मराठे, ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील, आणि ,व,अनोरे व धानोरा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश खंडू महाजन,अनोरे चे सरपंच स्वप्निल महाजन, ग्रामपंचायत सदस्य हरी महाजन, उपाध्यक्ष मधुकर देशमुख, योगराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तर पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, काशीनाथ महाजन, पितांबर पाटील आदी उपस्थित होते.
निवड झाल्याबद्दल भगवान महाजन यांनी सर्व सदस्य व ग्रामस्थांचे आभार मानले. भविष्यात सोसायटी च्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी भगवान सिताराम पाटील, पितांबर महाजन, पांडुरंग महाजन, प्रकाश रोकडे, पितांबर माळी, दिनेश तायडे, रत्नाबाई पाटील, सुधाकर वारडे आदि पदाधिकारीची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.