अमळनेर (प्रतिनिधी) देवगाव देवळी येथील शिक्षणप्रेमी अंकुश नामदेव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा व सत्र न्यायालय धुळे अंतर्गत शिरपूर न्यायालयाचे स्टेनो ग्राफर गोपाल अंकुश पाटील यांच्या वतीने संपूर्ण गावाला भंडाऱ्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सकाळी आदिशक्ती आशापुरी मातेची पूजा व आरतीचा,होमहवन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तरुण जोडपे यांनी पूजेचा लाभ घेतला. आदिशक्ती आशापुरी मातेचे दर्शन तालुक्यातील अनेक भाविकांनी घेतले. महाप्रसादाला देवगांव देवळी येथील संपूर्ण गावातील बंधू भगिनी ,मित्रपरिवार व तालुक्यातील भाविकांची उपस्थिती होती. मंदिरावर लाइटिंगची रोशनी करण्यात आली आहे. मंदिरातील परिसर स्वच्छ व सुंदर व शांतमय वातावरणामुळे मनाला एक शांती मिळत असते. जळगांव जिल्ह्यातील भाविकांचं एक श्रद्धास्थान म्हणून आदिशक्ती आशापुरी मातेचे मंदिर देवगांव देवळी येथे असून ते जागृत देवस्थानपैकी एक आहे. यासाठी आदिशक्ती आशापुरी ट्रस्ट देवगांव देवळी नेहमीच प्रयत्नशील असते.
अष्टमीनिमित्ताने महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या वेळेस सहकार्य धर्मराज पाटील ,नवलदादा पाटील ,महादू पाटील, बाळूदादा पाटील, कैलास पाटील, छोटू पाटील, विश्वासराव पाटील, युवराज पाटील ,सुकदेव पाटील, सुदाम पाटील, चंद्रभान पाटील, मोतीलाल पाटील, निंबा पाटील ,सुरेश पाटील, दिनेश पाटील, योगेश पाटील, भटू पाटील, मुकेश पाटील, रवींद्र माळी, विकास पाटीलसह आदिशक्ती आशापुरी ट्रस्ट ,सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, आशापुरी मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, राजे मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ तरुण युवक देवगांव देवळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.