वरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सोपान रमेश मावळे (वय १९), सचिन सुभाष मावळे (वय-१८ रा. पिंपळगाव बुद्रुक) हे दोन्ही तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, सोपान मावळे आणि सचिन मावळे हे दोघे (एमएच १४ सीटी ४७९८ ) क्रमांकाच्या दुचाकीने दिपनगर येथून पिंपगळगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून जात असतांना जाडगाव फाट्यानजीक भरधाव वेगाने येणारा ट्रक (एमएच १५ एफव्ही १४१३) ने जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक सचिन मावळे हा जागी ठार झाला. तर जखमी झालेला सोपान हा उपचारासाठी नेत असतांना रस्त्यावरच मृत्यू झाला. घटना घडताच ट्रकचालक फरार झाला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















