अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात पिळोदा येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक बुधवारी संपन्न झाली. यात सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी पद्माबाई गोरख पवार यांची निवड करण्यात आली.
भारती पाटील ह्या माजी सरपंच प्रकाश लोटन पाटील यांच्या पत्नी आहेत. भारती पाटील यांच्या निवडीचे आमदार अनिल पाटील यांनी अभिनंदन केले आहे. भारती पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार समर्थ मेडिकलचे संचालक संजय पाटील, भैय्यासाहेब पाटील, विकास सोसायटी चे चेअरमन शिवाजी पाटील, दिपक पाटील, पंकज पाटील आदींनी केला. यावेळी आत्माराम सिताराम बोरसे, जया नरेंद्र पाटील, तीलोत्तमा प्रशांत पवार आदी सदस्य उपस्थित होते. तसेच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.