धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचपूरा येथे विविध कामांचे भूमिपूजन,उदघाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चिंचपुरा ते वराड रस्ता डांबरीकरण १ कोटी २४ लक्ष, जलजीवन मिशन १९ लक्ष, २५/१५ मधून ८ लक्ष काँक्रीटीकरण, आमदार निधीमधून ५ लक्ष काँक्रीटीकरण २५/१५ सामाजिक सभागृह, १० लक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायविभाग अंतर्गत ५ लक्ष जिल्हा परिषद शाळांसाठी वॉल ४ लक्ष नावीन्य पूर्ण योजना मधून २ बागडे. या विविध कामांचे भूमिपूजन,उदघाटन आणि लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर सोहळ्याचे आयोजन दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
यावेळी आमदार.मंगेशजी चव्हाण, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भाजपचे ओबीसी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष अॅड. संजय महाजन, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील,तालुका संघटक रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गोपाल बापू चौधरी,भाजपा नेते शिरीष बयस,सुभाष देवराम पाटील,शहर प्रमुख विलास महाजन तरी परिसरातील सर्व शिवसेना युवासेना – भारतीय जनता पक्षाचे , सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य ,विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला आघाडी, शेतकरी सेना , मागासवर्गीय सेना, अल्पसंख्याक सेना, दिव्यांग सेना, विकास सोसायटी चेअरमन व्हा चेअरमन यांनी उपस्थित राहावे, असे आव्हान चिंचपुरा ग्रामपंचायतने केले आहे.