जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील दुसऱ्या अटक सत्रातील ११ संशयितांना पुणे विशेष न्यायालयाने १४ जुलै रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामीन देतांना न्यायालयाने संशयितांना मॅच केलेल्या पावत्यांची एकूण २० टक्के रक्कम भरण्याची प्रमुख अट घातली होती. त्यानुसार सर्व संशयितांनी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले आहेत.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. सर्व संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणी होऊन विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार १५ आॅक्टोबर २०२१ पर्यंत परतफेड करायच्या ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. या अटींनुसार सर्वांनी पैसे भरले आहेत.
कोणी भरले किती पैसे
जयश्री तोतला (२९ लाख ३३ हजार ५९४ रुपये), अंबादास मानकापे (५४ लाख २३ हजार ३२८ रुपये), संजय तोतला (२० लाख ५८ हजार ७३४ रुपये), राजेश लोढा (२६ लाख २८ हजार९१२ रुपये), आसिफ तेली (२२ लाख ४२ हजार ४२५ रुपये), जयश्री मणियार (१७ लाख ९३ हजार ४१२ रुपये), प्रीतेश जैन (३० लाख २१ हजार ९९० रुपये), छगन झाल्टे (३४ लाख ३५ हजार ९९८ रुपये), जितेंद्र पाटील (१३ लाख ५१ हजार २९० रुपये), भागवत भंगाळे (२१ लाख ८ हजार), प्रेमनारायण कोकटा (४३ लाख २० हजार), असे सर्व संशयितांनी न्यायालयात एकूण ३ कोटी १३ लाख १७ हजार ६८३ रुपये भरले आहेत.