TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आरोपी ठेवीदारांना धमक्या द्यायचे ; सरकारी पक्षाचा आरोपींच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत पैसे परत मागण्यास येणाऱ्या ठेवीदारांना आरोपी धमक्या द्यायचे. पतसंस्थेच्या परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण होते, यासह अनेक गंभीर मुद्दे मांडत सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपींच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे. दरम्यान, सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज अपूर्ण राहीला असून तो उद्या युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अॅड.प्रवीण चव्हाण यांनी संशयित आरोपींच्या जामीन अर्जाला आजपासून युक्तिवादद्वारे विरोध करायला सुरुवात केली आहे. अॅड. चव्हाण यांनी आज न्यायालयासमोर अनेक गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या. त्यात प्रामुख्याने बीएचआर पतसंस्था ही मल्टीस्टेट असल्यामुळे तिला एमपीडीए कायदा लागू होतो. आरोपींविरुद्ध याच कायद्यान्वये गुन्हा दाखल आहेत. हे कलम अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे आरोपींना जामीन देण्यात येऊ नये. तसेच पावत्या मॅचिंग करताना पावत्या कायद्याप्रमाणे मॅचिंग केल्या असे, गृहीत धरले तरी ही रक्कम कंडारीने शासन जमा केली नाही. तसेच सत्तर टक्के पैसे मिळाल्याचे कोणत्याही प्रतिज्ञापत्रात नमूद नाही. पुरावे म्हणून अॅड. चव्हाण यांनी अनेक पुरावे न्यायालयासमोर ठेवले.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दरम्यान, सोमवारी ५ संशयितांच्या वकिलांनी जामीनासाठी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती. तर याआधी २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपले म्हणणे कोर्टासमोर सादर केलेले आहे. बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे.

यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), राजेश लोढा (जामनेर) या संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे.

त्यानंतर २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाईच्या वेळी आपली बाजू मांडली आहे. तर ५ जुलैला छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, प्रितेश चंपालाल जैन, प्रेम नारायण कोकटा, राजेश लोढा या उर्वरित संशयितांच्या वतीने अॅड.सुधीर शहा आणि एस.पी. जैन यांनी युक्तिवाद केला होता. ६ जुलैला सुजित वाणी, संजय तोतला आणि अंबादास बाबाजी मानकापे या तिघांच्या वकिलांनी आज जामीन अर्जावर आपली बाजू मांडली. दरम्यान, आज (गुरुवार) पासून सरकार पक्षाने युक्तिवाद सादर करायला सुरुवात केली आहे. आज अपूर्ण राहिलेला युक्तिवाद सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण उद्या (शुक्रवार) रोजी पूर्ण करण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती एस एस गोसावी यांच्या न्यायालयात या सर्व जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

इकरा एज्युकेशन सोसायटीतर्फे दिवंगत युसुफ खान ऊर्फ दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधीवर गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

October 27, 2021

रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी केंद्राने मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

January 18, 2022

वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी २६ कोटींची तरतूद !

July 13, 2021

लोकसभा निवडणुकीत मोदींना पराभूत करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा

October 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group