जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरच्या मालमत्तेचे बाजारभावापेक्षा कमी किंमतीचे खोटे मुल्यांकन करून घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर आता पुण्याच्या मालमत्तेची जळगाव आणि पुण्याच्या सरकारमान्य व्हॅल्यूअरने काढलेल्या किंमतीत मोठा फरक होता. दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अशा प्रकारे संस्थेच्या लिलावाव्दारे विक्री झालेल्या वेगवेगळ्या मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन केले, असता त्यात ४८ कोटी ५६ लाख २५ हजार ८२० रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, या बहुतांशी ठेवीदारांना त्यांची पुर्ण रक्कम मिळालीच नाही तर काही ठेवीदारांना काहिच रक्कम मिळाली नाही. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, श्री साई मार्केटिंग अॅन्ड ट्रेडींग कंपनी यांना व इतरांना विकलेल्या मालमत्ता खरेदी किंमतीपेक्षाही कमी किंमतीत विक्री केलेल्या आहेत. सर्व प्रमुख शहरातील महत्तवाच्या ठिकाणाच्या मालमत्तांच्या किंमती वाढत असताना लिलावात सदर मालमत्तांना कमी रक्कम मिळणे संशयास्पद आहे. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, या मालमत्ता विकताना आविनाश सोनी (रा. जळगाव) या सरकारमान्य व्हॅल्यूअरने मुल्यांकन केले होते. घोले रोड रानडे निवास पुणे येथील चार दुकाने वेगवेगळी दाखवून प्रत्येकी २ कोटीप्रमाणे एकुण ८ कोटी रुपयात सन २०१० मध्ये बीएचआर पतसंस्थेने विकत घेतली होती. परंतू या दुकानांचे एकत्रित अपार्टमेंट दाखवून ते बाजारमुल्यापेक्षा जास्त रक्कम दाखवून ३,११,३३,१११ ला श्री. साई मार्केटिंग अॅन्ड ट्रेडींग कंपनीला विकली आहे.
त्यामुळे या मालमत्तेचे पुणे येथील शासनमान्य व्हॅल्यूएटर मिलींद अंकलगी, यांची नेमणुक करून त्यांच्याकडून सन २०१६ मधील त्याचे व्हॅल्यूएशन करून घेतले असता त्यांनी त्याची किंमत ७,४०,००,०००/- रू. (७ कोटी ४० लाख रु.) अशी ठरविलेली आहे. मिलींद अंकलगी यांनी मुल्यांकन करताना त्या जागेच्या शेजारी असणा-या दुकानांचे खरेदीखत किंवा लिजवर दिले आहे. याचा आधार घेतला आहे. अविनाश सोनी यांनी मात्र नेमका आधार नमूद केला नाही? व बाजारातील किंमतीची चौकशी करून त्यांनी किंमत ठरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्हॅल्यूअर मिलींद अंकलगी (रा. पुणे) अधिक विश्वसनीय आहेत. अशा प्रकारे संस्थेच्या लिलावाव्दारे विक्री झालेल्या वेगवेगळ्या मालमत्तांचे पुर्नमुल्याकंन व्हॅल्यूएटर मिलींद अंकलगी यांचेमार्फत केलं असता विक्री झालेल्या मालमत्तांमधून नक्कीच जास्त किंमत मिळाली असती हे दर्शविणारा टाकता खालीलप्रमाणे !
विजय वाघमारे (9284058683)