जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनने आज आपल्या वकीलामार्फत एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे वैद्यकीय उपचारासाठी परवानगी मागितली आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनचा जामीन अर्ज २२ जानेवारीला न्यायालयाने फेटाळून लावला होता. दुसरीकडे आज (दि.२७) धरम सांखला, विवेक ठाकरे, सुजित वाणीच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता होती. परंतू काही कारणास्तव जामीन अर्जावर निर्णय आला नाही. दरम्यान,दुसरीकडे बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनने आज आपल्या वकीलामार्फत एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे वैद्यकीय उपचारासाठी परवानगी मागितली आहे. यावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.