जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैनच्या जामीन अर्जावर उद्या (बुधवार) हायकोर्टात सूनवाई होणार आहे.
महावीर जैनचा जामीन अर्ज २२ जानेवारीला पुणे न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर महावीर जैन मुंबई हायकोर्टात गेले होते. त्यावर २२ फेब्रुवारीला सूनवाई होणार होती. परंतू बोर्डावर केस न आल्यामुळे आता उद्या (गुरुवारी) यावर सूनवाई होणार आहे.
दुसरीकडे धरम सांखला, विवेक ठाकरे, सुजित वाणीच्या जामीन अर्ज देखील फेटाळलेले आहेत. सीए महावीर जैन जामीन अर्ज न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळून लावला होता. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत. दरम्यान, या घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे हे फरार आहेत.