TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या…झंवर, कंडारेच्या अटकेची संपूर्ण कहाणी ; चित्रपटाप्रमाणेच रंगला सर्व थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याचे दोन प्रमुख सूत्रधार सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे यांच्या अटकेसाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील काही महिन्यापासून जबरदस्त मेहनत घेतली होती. अगदी कंडारे आणि झंवरच्या अटकेची संपूर्ण कहाणी वाचल्यानंतर तर जणू एखादं चित्रपटात रंगलेली थरारक वाचत असल्याचा अनुभव येईल !

साकेत परिसरात वास्तव्य ; पोलिसांना गुंगार दिल्यानंतर सुनील झंवरला अटक

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

साधारण नऊ महिने पोलिसांना गुंगार दिल्यानंतर सुनील झंवरला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तत्पूर्वी २८ जून रोजी जितेंद्र कंडारे याला अटक करण्यात आली होती. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या या दोघांनी पोलिसांना चांगलाच गुंगार दिला. परंतू दोघांनी बेपत्ता असल्याच्या काळात बहुतांश वेळ इंदूर (मध्यप्रदेश) येथे घालवला होता. या दोघाच्या किमान सहा वेळा इंदूरच्या साकेत परिसरात भेटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अगदी अटक केल्याच्या दिवशी देखील कंडारेने झंवरची भेट घेतल्याचे समोर आले आहे. परंतु, ही बाब पोलिसांना माहितीच नसल्यामुळे झंवर पळुन जाण्यास यशस्वी झाला. अवघ्या दिड महिन्यात पुन्हा एकदा याच साकेत परिसरात तपासाची चक्रे फिरल्यानंतर तेथुन नाशिक येथे पळुन आलेल्या झंवरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या दोघांच्या पळुन जण्यासह लपुन राहिल्याची क्राईम स्टोरी या निमित्ताने समोर आली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, पुण्याच्या सायबर क्राईम ब्रान्चचे उपनिरीक्षक रवींद्र गवारी, शिरीष गावडे या दोघांनी कंडारे व झंवर यांना कसे पकडले याची स्टोरी समोर आली आहे.

साकेत परिसरात झंवरचा शोध घेणे कठीण, नंतर ३० मोाबईल नंबर ट्रॅकींगवर टाकुन तपास

तत्पूर्वी उपायुक्त नवटके यांनी पुन्हा एकदा उपनिरीक्षक गवारी व गावडे यांची निवड केली. २ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा इंदूर येथे पोहोचले. परंतु, सुनीलचा मुलगा सुरज हा देखील इंदूरमध्ये राहत होता, कार वापरत होता. त्यामुळे माहिती मिळण्यास अडचण आली. सुरजला राज्यात फिरण्याची परवानगी मिळताच दुसऱ्याच दिवशी तो जळगावला आला. त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी घेतले होते. तर सुनील झंवर याचा काहीच थांबपत्ता नव्हता. साकेत परिसरात प्रशस्त बंगले, उच्चब्रु वस्ती असल्यामुळे शोध घेणे देखील कठीण झाले होते. अखेर झंवरचे विविध ३० मोाबईल नंबर ट्रॅकींगवर टाकुन तपास सुरू ठेवला. त्याच्या एका जुन्या मोबाईलमध्ये अवघ्या १५ मिनीटांसाठी एक नवीन सिमकार्ड टाकले नंतर काढले. हा नंबर मिळताच पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

सुनील झंवर नाशकात असल्याची पोलिसांना झाली खात्री

परंतु, नंतर ते सिमकार्ड एका डोंगलमध्ये वापरण्यास सुरूवात झाली. केवळ अॅक्टीवेट करण्यासाठी त्याला मोबाईलमध्ये टाकले होते. डोंगलमध्ये वापर सुरू झालेल्या सिमकार्डचे लोकेशन साकेत परिसरातच होते. ८ ऑगस्ट रोजी लोकेशन बदलले. हे सिमकार्ड महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे कळताच दोन्ही पोलिसांनी पाठलाग करण्यास सुरूवात केली. नाशिकच्या पंचवटी परिसरात हा प्रवास थांबला. तेथील राजेश इंदाणी याच्या बंगल्यात सुनील झंवर थांबला होता. परंतु, पोलिसांनी प्रत्यक्ष घराचे लोकेशन माहित नव्हते. यासाठी रात्रभर पाळत ठेवली. मध्यप्रदेशातून प्रवास करुन आलेली आणि चिखलाने माखलेल्या इनोव्हा कारचा शोध पोलिसांनी सुरू केला. अखेर ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ०००१ क्रमांकाची कार पोलिसांना दिसली. ही कार सुरज झंवर वापरत असल्याचे पोलिसांना माहिती होते. परंतु, सुरजचे लोकेशन मुंबईत असल्यामुळे ही कार सुनील झंवर यानेच आणल्याची पक्की खात्री झाली. पण घर माहित नव्हते.

असे घेतले झंवरला ताब्यात

अखेर पोलिसांनी सकाळी सहा वाजेपासून पुन्हा पाळत ठेवली. आठ वाजता कारचा चालक आला, त्याने एक बॅग काढून बंगल्यात नेली. यानंतर सकाळी १० वाजता बंगल्याच्या गॅलरीत येऊन एका व्यक्तीने १० ते १५ मिनीटात १२ सिगारेट ओढल्या. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीचे फोटो काढुन घेतले होते. खात्री केली असता तोच सुनील झंवर असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, यावेळीही त्याला पळुन जाण्यास मार्ग असल्यामुळे पोलिस फक्त नजर ठेऊन होते. अखेर २० मिनीटांनी स्वत: सुनील झंवर कारकडे अाल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी आडवी लावुन त्याला ताब्यात घेतले. पंचवटी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. कायदेशीर प्रक्रीया पुर्ण केल्यांनतर त्याला पुण्याला हलवण्यात आले.

कंडारेची कहाणी : सुतारासोबत जोडली ओळख

गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे बेपत्ता झाला होता. स्वत:सह कुटुंबीयांनी सर्व मोबाईल क्रमांक बंद करुन नवीन सीमकार्ड वापरण्यास सुरूवात केली. कंडारेची सासुरवाडी साकेत येथे आहे. पण तो एकही दिवस सासुरवाडीला राहिला नाही. इतर जिल्हे, राज्यात फिरुन झाल्यानंतर तो अखेर साकेत येथे स्थिरावला होता. घरी कौटुंबीक कलह असल्यामुळे पळुन आलो आहे, नोकरी द्या, राहण्यासाठी व्यवस्था करा असे सांगुन त्याने एका सुतार व्यक्तीशी मैत्री केली. याच सुताराने त्याला साकेत परिसरातील एका ठेकेदाराकडे ४ हजार रुपये महिन्याने नोकरी लावुन दिली. लिहीण्याचे काम होते. तर राहण्यासाठी एका वसतीगृहात सोय करुन दिली. जेवणासाठी मेस लावली. येथे राहत असताना कंडारे हा आठवड्यातून किमान दोन वेळा साकेत परिसरातील एका चौकात सुतार व्यक्तीच्या दुचाकीने जात होता. तेथुन पुढे एका तास तो कुठे जायचा कोणालाही माहिती नव्हती. तासाभरानंतर तो पुन्हा सुतारास फोन करुन त्याच चौकात बोलवायचा तेथुन दोघे एखादी बियरबारमध्ये जाऊन दारु प्यायचे. कंडारे त्याला दारु पाजत होता. त्यामुळे सुतार देखील जास्त खोलात न जाता सहजपणे त्याला मदत करीत होता.

हातातील बांधलेल्या गंड्यावरुन कंडारेची ओळख अन् पोलिसांनी केली अटक

कंडारेचे पुर्वीचेही सर्व सिमकार्ड बंद असल्यामुळे पोलिसांना सुगावा लागत नव्हता. केवळ त्याने एक जुना नंबर एका दिवसासाठी सुरू केला याच नंबरवर सुतारने दोन वेळा फोन केले होते. त्यामुळे पोलिसांना कंडारेच्या जुन्या नंबरवर फोन करणाऱ्या सुतारचा नंबर मिळाला. त्याचा आधारे उपनिरीक्षक गवारी व कर्मचारी गावडे यांनी इंदूर गाठले. मोबाईल लोकेशनच्या आधारावर साकेत परिसरात सहा ते सात दिवस पाळत ठेवली. याच परिसरात कंडारेचे सासरे राहत असल्यामुळे त्यांना फोन करुन धमकावले. परंतु, कंडारे सासुरवाडीत गेलाच नसल्याचे निष्पन्न झाले. पाच दिवस शोध घेतल्यानंतर एका वसतीगृहात कंडारे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कंडारेला त्यांनी ओळखले. उजव्या हातातील बांधलेल्या गंड्यावरुन त्याची ओळख पटली. दोन दिवस वसतीगृहाच्या समोर पाळत ठेवल्यानंतर खात्री झाली. परंतु, ताब्यात घेण्याच्याच दिवशी कंडारे सुतारसोबत दुचाकीवर बसुन इंदूर शहरात फिरत होता. तो पळुन जाणार असाही संशय पोलिसांना हाेता. अखेर साकेत परिसरतील एका चौकात त्याला थांबवुन ताब्यात घेतले. पोलिसांनी ओळख दिल्यानंतर त्याने आढेवेढे न घेता स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे या दोन पाेलिसांनी कंडारेला ताब्यात घेतले.

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

इस्त्रोच्या सॅटेलाईट ईओएस-०३चं प्रक्षेपण मोहीम अपयशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचा ग्राहकांना सावधानतेचा इशारा ; वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका

June 12, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ८ जानेवारी २०२५ !*

January 8, 2025

भुसावळ नगरपालिका हद्दीत धूर फवारणीबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन !

October 17, 2021

‘ऊसतोड कामगारांची मुलं फडात नाही तर लवकरच शाळेत दिसतील; धनंजय मुंडे

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group