जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरातून रोकड, सोने, चांदीची दागिने असा साधारण ३५ लाखाचा मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी तब्बल २० कारणे दिली होती. त्यात प्रामुख्याने संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारेच्या घर झडतीमध्ये रोख रक्कम ९ लाख ७८ हजार रुपये. तसेच २१ लाख ५२ हजार ८४० या रकमेचे सोन्याचे दागिने तर ३,३४,१९६ या रकमेचे चांदीच्या विटा, असा मुद्देमाल जप्त केल्याचे म्हटले आहे. तसेच त्याबाबत आरोपी धरम साखला, विवेक ठाकरे, महाविर जैन, सुजित वाणी यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. त्याबाबत करण्यात आलेल्या तपासात सहकार्य करीत नाही, असेही कारण पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, कंडारे यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
















