जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी विवेक ठाकरेंच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनवाई टळली आहे. आता पुढील सुनवाई ११ जानेवारीला होणार आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे याचा ड्रायव्हर कमलाकर कोळी याला मंगळवारी पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जावर ११ जानेवारीला निकाल देण्यात येणार आहे. तसेच विवेक ठाकरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतू सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण हे कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे ते आज कोर्टात येऊ शकले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी आता ११ जानेवारीलाच होणार आहे. सीए महावीर जैन यांच्या जमीन अर्जावर देखील ११ तारखेलाच सुनवाई होणार आहे. कोळी, ठाकरे आणि वाणी यांच्यावतीने अॅड. उमेश रघुवंशी यांनी कामकाज पाहत आहेत.