जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. तपासानुसार बीएचआर घोटाळा नुसता पूर्वनियोजित नव्हता तर या गुप्त कटाचे तीन प्रमुख हेतू देखील होते. तर जाणून घ्या…या गुप्त कटाचे नेमके तीन प्रमुख हेतू काय होते?.
अ) बीएचआर संस्थेचे स्वॉफ़्टवेअर बदलून त्यात त्यांना हव्या तशा मागील तारखेच्या नोंदी करता येतील व सदरची बीएचआरची माहिती बीएचआरमधून घेण्याऐवजी सुनिल झंवरच्या ४२/४३ खानदेश मिल कॉम्पलेक्स, जळगाव या कार्यालयातील संगणकावर इनस्टॉल करुन घ्यावयाचे व तेथून बीएचआरची मालमत्ता व ठेवींच्या अपहारासाठी त्याचा वापर करायचा.
ब) ठेवी गोळा करण्यासाठी एंजटची साखळी निर्माण करायची. ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करायचे, संस्था अवसायानात गेली, ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या असे भीतीचे वातावरण निर्माण करुन ठेवीदारांकडून ठेवी गोळा करायच्या व सुनिल झंवरच्या कार्यालयात सदरच्या ठेवींची २० ते ३५ टक्क्याने रक्कम देण्याचे आमिष दाखवून अन्यथा ठेव बुडेल, असे भितीदायक वातावरणाची निर्मिती करून ठेवी स्विकारायच्या व त्या ठेवी कर्जदारांशी संगनमत करुन त्यांच्या कर्जात पुर्ण रकमेने वळत्या करायच्या व कर्जदारांकडून सुध्दा त्याला झालेल्या फायद्याच्या काही प्रमाणात पैसा घ्यावयाचा.
क) तसेच शासकीय वेबसाईट उपलब्ध असताना आरोपींचे पुर्ण नियंत्रण असेल अशी खाजगी वेबसाईट कुणाल शहाकडून तयार करुन घेतली. त्याचा पासवर्ड व सोर्सकोड सुनिल झंवर, महावीर जैन, सुरज झंवर, जितेंद्र कंडारे, कुणाल शहा इ. यांचेकडे ठेवुन त्याद्वारे कोणत्या व्यक्तीने किती रक्कमेचे टेंडर भरले यांची माहिती संशयित आरोपींना मिळू शकेल अशी व्यवस्था केली. यासाठी टेंडर समिती आपल्याच व्यक्तिंची तयार करायची. जेणेकरुन टेंडर स्विकारताना संशयित आरोपींच्या बाजूचे निर्णय घेणे व त्यांनाच मालमत्ता अपहार करता यावी अशी व्यवस्था करण्यात आली होती.
विजय वाघमारे (9284058683)