TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवरच्या माडसांगवी येथील जमीन खरेदीविरोधात याचिका दाखल करण्याचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाशिकमधील मांडसांगवी येथील १०० कोटीची जमीन बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवरने अवघ्या तीन कोटीत घेतली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी आदेश दिले होते. त्यानंतर आता अपर महसूल सचिवांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आव्हान याचिका दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे झंवरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, बीएचआर घोटाळ्याचा पैसा मांडसांगवी येथील जमीन खरेदीत गुंतवल्याचा राज्य शासनाला संशय आहे. तर दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी या जमीन खरेदीत शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला असल्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रींकडे तक्रार केली होती.

 

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

महसूल सचिव नितीन करीर यांचे आदेश

 

माडसांगवी जमीन खरेदी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना महसूल न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याचे व तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी राबविलेल्या प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत अपर महसूल सचिव नितीन करीर यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

 

काय आहे जमिनीचा नेमका वाद

 

नाशिक-औरंगाबाद महा-मार्गावरील मांडसांगवी (ता. नाशिक) येथील ४३ एकर जमीन प्रथम उद्योगांसाठी भारती स्टील कंपनीला देण्यात आली होती. परंतु मुदतीत कंपनीने वापर सुरू न केल्याने ग्रामस्थ व जमिनीच्या मूळ मालकांनी कंपनीला मुदतवाढ देण्यास विरोध दर्शविला होता. त्यांनतर २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव सातबाऱ्यावर लागले. दुसरीकडे कुंभमेळ्यातील सिंहस्थासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली. दरम्यानच्या काळात हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले. यात नाशिक तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालयाचे पत्रव्यवहारानंतर पुन्हा ही जमीन भारती स्टीललाच परत द्यावी लागली. या प्रकरणात अचानक शासकीय जमीन एकाएकी भारती स्टील कंपनीच्या नावे झाली. त्यानंतर दोन महिन्यांतच ही जमीन सुनील झंवर यांच्यासोबत अवघ्या तीन कोटीत शासकीय मूल्यांकनात खरेदीचा व्यवहारही पूर्ण झाला होता. त्याचे नावही सातबाऱ्यावर लागले. गावकऱ्यांच्या विरोधामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय महसूल आयुक्तांकडे हे प्रकरण गेले. दरम्यान, बीएचआरमधील घोटाळ्याचा तपास करणारे पथक चौकशी करणार असून यात ठेवीदार कर्जदारांचा पैसा वापरल्याचा संशय आहे.

 

एकनाथराव खडसेंची तक्रार

 

मांडसांगवीच्या जमीन खरेदी प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांनी सुनील झंवर यांच्याशी आर्थिक संबंध जोपासून संपूर्ण व्यवहारच संशयास्पद केला असून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी आदेश दिले होते. या तक्रारीत सुमारे शंभर कोटी रुपये किमतीची जमीन अवघ्या तीन कोटी रुपयांत खरेदीच्या प्रकरणात अनेक अनियमितता व संशयास्पद प्रकार असल्याने चौकशीची करण्यात यावी, असे तक्रारीत खडसे यांनी म्हटले होते. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली होती. त्यांनी प्राथमिक अहवालही सादर केला होता.

 

जाणीवपूर्वक सुनील झंवरला जमीन विक्री?

 

माडसांगवी येथील गट नं. १३/ब ही जमीन अकृषिक वापराकरिता वर्ग झालेली होती. याबाबत भारत स्टील कंपनीला माहीती होती. तरी देखील कंपनीने जाणीवपूर्वक सुनील झंवर याला ही जमीन विक्री करताना शेती प्रयोजनाकरिता विकल्याचे खरेदी दस्तावरून समोर आले आहे. त्यामुळे हा व्यवहार कायदेशीर आहे का? या सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

बालिका सप्ताहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य ; जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार १७ मार्च २०२२ !

March 17, 2022

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत : उद्धव ठाकरे  

July 1, 2022

डॉ. अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

February 27, 2022

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून पारोळ्यात भरला गुरांचा बाजार..!

September 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group