पोखरी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत तीन लाख रुपयाचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच गोकुळ शिंदे, उपसरपंच सरला नवल पारधी, प्रतिभा नवल शिंदे, एकनाथ ठाकरे, संतोष राठोड, सुभाष भराडी, ग्रामसेवक देविदास पाडळे, ग्रामपंचायत कर्मचारी किसन राठोड, रोजगारसेवक महेंद्र शिंदे, सर्व शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. मागणी केल्यावर तत्काळ निधी उपलब्ध करून दिला व त्वरित काम सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.