धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या जागेचे उद्या दि.१६ एप्रिल,२०२२ शनिवार रोजी सकाळी ९.०० वाजता, बालाजी नगर, धरणगाव या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष व भूमिपूजन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे खा. उन्मेष पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती खर्ची आश्रम, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, ह.भ.प. सदाशिव महाराज, नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांच्या शुभहस्ते होणार आहे. तद्नंतर प्रतिमा पूजन धानोराचे सरपंच भगवान आसाराम महाजन, जिल्हा नियोजन समिती सदस्य डी.जी.पाटील, मिलिंद भालचंद्र पाटील अनोरे, नाना बापू महाजन मोरफळ व
सर्व संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पडणार आहे. भूमिपूजन सोहळा कार्यक्रम प.पू. जोग महाराज, प.पू. मोठे बाबा, पांडुरंग महाराज वैद्य आळंदी, प.पू. आर. बी. पाटील कै.हभप गंभीर एका महाजन कै.ह.भ.प रूपाबाई महाजन व संत महात्म्यांच्या आशीर्वादाने होत आहे. या आनंदमयी भूमिपूजन सोहळ्याला पंचक्रोशीतील भजनी मंडळ व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हभप हिरालालजी महाराज व कार्यकारी मंडळ धरणगाव यांनी केले आहे.