मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना मान्यता विधीमंडळाने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधान सभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही मान्यता दिल्याची माहिती मिळाली आहे.
विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदावर दावा केला होता. पण नियमानुसार चौधरी यांची विधीमंडळात नोंद केल्याची माहिती समजते.
गटनेते एकनाथ शिंदे यांनी गट नेते पदावरून दावा केला होता. आता नियमानुसार चौधरी यांची विधीमंडळात नोंद केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना पुढील भूमिकेसाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. या पेचावर कोर्ट काय निर्णय देतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.