मुंबई (वृत्तसंस्था) भारतातील सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने आयात केले जाते. आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर देशातंर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या दरात वाढ होणे अटळ मानले जात आहे. आजपासून सोने खरेदी करणे महाग झाले आहे.
सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढवले आहे. केंद्रीय महसूल विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आत्तापर्यंत सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्के होते, जे उपकर आणि इतर शुल्कांसह 10.75 टक्के होते, परंतु 5 टक्के वाढीसह ते आता 15.75 टक्के होणार आहे.शेअर बाजारांच्या परिस्थितीमुळे देशात सोन्याची मागणी वाढली आहे.
सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. सोने सुमारे 2500 रुपयांनी सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात केली होती. आयात बिलात सातत्याने वाढ होत असल्याने परकीय चलन साठ्यावरही परिणाम झाला आहे.