TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : धरणगावला लागून डॉ. हेडगेवार नगर नावाच्या नवीन गावाची स्थापना !

महसुली गाव अस्तीत्वात आल्याचे राजपत्र प्रसिद्ध ; आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही : डी.आर. पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2022
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका हददीत समाविष्ट नसलेल्या क्षेत्रासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्यात येत असल्याचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये तत्कालीन माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी देखील अधिसूचना काढली होती. परंतू नंतर प्रशाकीय कारवाई झाली नव्हती.

महाराष्ट्र शासनाचा आदेश जशाचा तसा
महाराष्ट्र शासनाचे क्रमांक व्हीपीएम २०२०/प्र.क्र.१५/पंरा.४ (२२). नुसार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन ) कलम ४ या संदर्भात काढण्यात आलेल्या सर्व सूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि जळगाव जिल्हा परिषदेची स्थायी समिती यांच्याशी विचारविनिमय करून, आणि जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवारनगर या महसुली गावातील ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवारनगर या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे डॉ. हेडगेवारनगर, स्वतंत्र गाव या नावाने ओळखले जाईल तो दिनांक म्हणून १८ जुलै २०२२ हा दिवस विनिर्दिष्ट करीत आहेत. दरम्यान, शासनाचे उपसचिव पी.डी.देशमुख यांच्या नावे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

 

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशात नेमकं काय म्हटले होते?

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशात म्हटले होते? की, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेल्या दुरध्वनी संदेशानुसार तत्काळ हा आदेश देण्यात येत असल्याचे या संबंधातील पत्रात म्हटलेले होते. तसेच या भागासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्याचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४ चे पोटकलम (४) नुसार डॉ. हेडगेवार नगर महसूली गाव स्थापन करण्यासाठी प्रारूप अधिसुचना दि.२०-०९-२०२० रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या नव्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असेही या पत्रात म्हटले होते. परंतू कालांतराने हा विषय मागे पडला होता.

 

धरणगावात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा !

डॉ. हेडगेवार यांच्या नावाने नवीन गावाची स्थापना होत असल्याचे काळताच आज धरणगावकरांच्या आनंदाला उधाण आले. धरणगावात फटाके फोडून आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावातील मान्यवरांनी बैठक घेत या निर्णयाचे स्वागत केले. या बैठकीला प्रा.आर.एन महाजन सर, संघ परिवाराचे बाळसाहेब चौधरी, सुनील वाणी, एमएच.चौधरी, दत्तात्रय चौधरी, चंद्रशेखर अत्तरदे, मंदार चौधरी, राजेंद्र गांगुर्डे, अनिल देशमाने,वैभव बोरसे, प्रा. ए. आर पाटील, प्रा. डी.डी.पाटील, शिरीष बयस, संजय महाजन, कन्हैय्या रायपुरकर, दिलीप महाजन यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. हेडगेवार यांच्या नावाने नावारूपाने आलेल्या देशातील प्रथम गावाची प्रतिमा जपणे आपल्या सर्वांचे कर्त्यव्य आहे. डॉ. हेडगेवार यांना संस्कार, समरसता आणि बंधुत्व असणारे गाव अपेक्षित होते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे डॉ. हेडगेवार यांच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आजचा आनंदाचा दिवस सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उजळला आहे.
– बाळासाहेब चौधरी (पश्चिम क्षेत्र कार्यावाह,संघ परिवार)

आपल्या देशातील महान देशभक्त डॉ. हेडगेवार यांच्या नावाने धरणगाव लगत एक नवीन गाव अर्थात ग्रामपंचायत अस्तिवात येत असल्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी या गोष्टीसाठी सहकार्य केले होते, सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला होता. सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन !
– प्रा. डी.आर. पाटील (अध्यक्ष, धरणगाव बालाजी व्यवस्थापक मंडळ)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
Next Post

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे : डॉ. चंद्रमौली जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त क्लार्कला सात दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ उकळलेले 18 लाखपैकी 17 लाख रुपये जळगाव पोलिसांनी मिळविले परत !

December 27, 2024

एरंडोल तालुक्यात भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर !

February 23, 2022

संतापजनक ! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे ; गुप्तांगही दाखवले

February 2, 2022

मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट मिळणार नाही ; केंद्राच्या भूमिकेवर आरोग्यमंत्र्यांची नाराजी

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group