धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर परिसरातील माजी नगरसेवक सुरेश महाजन यांनी आज आपल्या समर्थकांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संजय नगर परिसरातील माजी नगरसेवक सुरेश महाजन उर्फ बुटा भाऊ यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी गटनेते पप्पू भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा नुकताच पाळधी येथे रंगला. यावेळी माजी नगरसेवक विजय महाजन, शहर प्रमुख विलास महाजन, आय्यस शेख, जयेश महाजन, साबर शाहा, विजय महाजन (संजय नगर), राकेश महाजन,महेश पाटील,किरण चौधरी, सोपण महाजन,विक्की निकम, वासुदेव महाजन, अजय महाजन, अहमद खान पठाण, बुट्ट्या पाटील, प्रशांत देशमखु, सद्दम आली, तौसीफ पटेल आदि उपस्थित होते.