TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोसरी भूखंड प्रकरणी उपनिबंधकाला जामीन ; खडसे दाम्पत्याला पीएमएलए कोर्टाचे समन्स

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in कोर्ट, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी भूखंड प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे पीएमएलए कोर्टाने एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांना समन्स बजावले आहे. दरम्यान, त्यांना गुरूवारच्या आधीच न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या पाठोपाठ या व्यवहारात महत्वाची भूमिका असणारे तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर रवींद्र मुळे यांनी पीएमएलए कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर सोमवारी सुनावणी झाली. यात मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी रवींद्र मुळे हे या प्रकरणातील थेट लाभार्थी नसून ते ते चौकशीत सहकार्य करत असल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. यामुळे त्यांना जामीन मिळावा अशी विनंती त्यांनी दिली. यावर न्यायालयाने रवींद्र मुळे यांना सशर्त जामीन मंजूर केला. यात त्यांनी ईडीला चौकशीत सहकार्य करावे अशी अट टाकण्यात आली आहे. यासोबत मुळे यांना त्यांचा पासपोर्ट देखील ईडीकडे जमा करावा लागला आहे. दरम्यान, या प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयाने माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना कोर्टासमोर हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. यानुसार त्यांना गुरूवारच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

नेमकं ईडीच्या आरोपपत्रात काय?

तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांनी भोसरी येथील जमिनीचे बाजारमूल्य हे २३ कोटी रूपये असतांना खडसे यांच्या आप्तांसाठी याचे मूल्य २.७ कोटी रूपये इतके केले. यातून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तर एकनाथराव खडसे यांनी या सौद्यात आपल्याकडील ५० लाख रूपये मंदाताई खडसे यांच्या खात्यामध्ये वळविले आहेत. यात १५ लाख रूपये रोकडच्या स्वरूपात भरण्यात आले होते. यातील ३८ लाख रूपये भोसरी येथील भूखंडाची खरेदी करण्यात आल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

भुसावळात पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; आ. सावकारेंच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वक्फ बोर्डाच्या सदस्याकडून महिलेवर बलात्कार ; फडणवीसांचा दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब

March 15, 2022

काँग्रेसचेही भाजपला जशाच तसे उत्तर ; जावडेकरांचा ‘तो’ फोटो केला शेअर

May 3, 2022

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश !

May 14, 2023

पत्रकार कल्पेश महाजन यांना दिलेल्या नोटीसचा पत्रकार संघटनांसह सर्वपक्षीय निषेध !

October 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group