मुक्ताईनगर (प्रतिनिधी) रात्रीच्या गस्तीवर असलेल्या मुक्ताईनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ गोवंशाचे प्राण वाचविले आहेत. दुर्दैवाने वाहनात चार गोवंश मृतावस्थेत आढळून आलेत. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक आणि इतर असे ३ लोकं असे एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पो.ना. अंकुश नारायण बाविस्कर, पोलिस हेड कॉस्टेबल शैलेश एकनाथ चव्हाण पो.ना सुरेश तोताराम पाटील, चंद्रकांत नारायण बोदडे व मुकेश दिनकर महाजन अशांचे पथक हे नेहमी प्रमाणे आपल्या रात्रीच्या गस्तीच्या ड्युटीवर होते. गस्तीवर असलेले हे पथक प्रवर्तन चौकात आल्यावर त्यांना पुर्णाड फाट्याच्या पुढे रोडवर दि.17 जून मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास समोरून येणा-या एका ट्रकवर संशय आला की सदर गाडीत काहीतरी चोरीचा माल वाहतूक करून घेऊन आत आहे. पोलिसांच्या पथकाने वाहन वाहन (क्र HR-55 W 8561) यास हात देवून थांबवले. गाडी संपूर्ण ताडपत्रीने बांधलेली होती. ताडपत्री उघडून बघितले असता त्यात एकुण 16 गायी बेकायदेशीररित्या आढळून आल्या.
सदर गाडीतील असलेल्यांना त्यांचे नाव गाव विचाले असता त्यांनी त्याचे नाव (1) साबीर ईसराईल (वय 35, रा. बुरा, तहसील जिल्हा गुह), चालक अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फार (वय 36, रा कजबा कीठोर राज्य उत्तर प्रदेश), वसीम आसमोहम्मद (वय २५,सयीद पूर तहसील मोदीनगर, जि. गाजियाबाद, राज्य, उत्तर प्रदेश), (4) साहील खान सपात खान (वय 20, पोटला तहसील नुह जिल्हा नूह, राज्य, हरीयाणा) असे सांगीतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पोलीस उप निरीक्षक श्री. शेवाळे हे घटनास्थळी पोहचले. यानंतर वाहनाची संपूर्ण तपासणी केली असता १६ पैकी चार गाई मृतावस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने उर्वरित गाई श्री गजानन गोशाळेमध्ये पोचवण्यात आली. पोलिसांनी साधारण अडीच लाख रुपये किंमतीच्या गाई आणि सव्वा दोन लाखाची टाटा कंपनीची12 टायरी ट्रक असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यापेक्षा मारून फेकल पाहिजे होत