मुंबई (वृत्तसंस्था) इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षांचे निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. त्यांची ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून, दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या १७ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. याबद्दलची माहिती महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर दिली.
एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.
असा तपासा निकाल
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा .
पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासू शकता.
त्यानंतर तुम्हाला विषयानुसार प्राप्त झालेल मार्क वरील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.
















