भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मामाजी टॉकीज पसीसरात सीमा रवींद्र पाटील यांची दुचाकी प्रीमियर हॉटेल लगतच्या दवाखान्या समोरुन 24 नोव्हेंबरला चोरीला गेली होती. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित मेघराज चंदू भोई (गवळीवाडा, भुसावळ) यास अटक केली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार निलेश चौधरी, हवालदार समाधान पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल अमर अढाळे यांनी केली. पुढील तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहे.