धरणगाव (प्रतिनिधी) आज 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस शहरातील पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम पक्षाचा ध्वजारोहण व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष पी.सी आबा पाटील, शिरिषआप्पा बयस, ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड. संजयभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, जेष्ठ कार्यकर्ते अॅड. वसंतराव भोलाने, अशोक भांडारकर, मणीलाल महाजन, कडू महाजन, एकनाथ महाजन, रघुनाथ चौधरी, प्रल्हाद पाटील, भास्कर मराठे, पुनीलाल महाजन, कमलेश तिवारी, सुनील वाणी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी सर, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, नगरसेवक ललित येवले, सुनील चौधरी, मधुकर पाटील, सचिन पाटील, चंदन पाटील, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, गोपाल पाटील, आंनद वाजपेयी, हितेश पटेल, जुलाल भोई, वासुदेव महाजन, रवी मराठे, भूषण महाजन, विकी महाजन, उमाकांत पाटील, रवी पाटील, समाधान पाटील आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.















