धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जनकल्याण पतसंस्थेच्या हॉलमध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
कु.पूजा विजय पाटील धरणगाव तालुक्यात प्रथम (बालकवी ठोंबरे हायस्कूल) हिचा सत्कार सुभाष अण्णा पाटील यांनी केला. कु.साक्षी रमेश काटवे (पी.आर.हायस्कूल प्रथम) हिचा सत्कार अँड.वसंतराव भोलाने व नगरसेवक शरद अण्णा कंखरे यांनी केला. कु.दिव्या जनार्दन चव्हाण (इंदिरा गांधी कन्या हायस्कूल प्रथम) हिचा सत्कार माधुरीताई अत्तरदे यांनी केला. कु.अंजुमन काझी (अँग्लो उर्दू हायस्कूल प्रथम) हिचा अँड.संजय महाजन, जिजाबराव पाटील, कैलास माळी यांनी केला. कु.दिपाली दिलीप नेरकर (महात्मा फुले हायस्कुल प्रथम) हिचा सत्कार पुनीलालआप्पा महाजन, राकेश पाटील यांनी केला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.माधुरीताई अत्तरदे, अँड.वसंतराव भोलाने, राकेश पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, मार्केट कमिटीचे सभापती पुनीलाल आप्पा महाजन, जेष्ठ नगरसेवक शरद अण्णा कंखरे हे लाभले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अँड. संजय महाजन व गटनेते कैलास माळी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते शिरिष आप्पा बयास, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, ता.मीडिया प्रमुख टोनी महाजन, विजय महाजन, शरद भोई, जुलाल भोई, राजू महाजन, योगेश महाजन, भूषण कंखरे, विशाल महाजन, विक्की महाजन, विजय पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
















