TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या खासगीकरणाच्या वावडया भाजप उठवत आहे : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

खासगीकरणाचे वृत्त निराधार,असा कोणताही प्रस्ताव नाही - डॉ. राऊत यांचे स्पष्ट प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयशी झाल्याच्या नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खाजगीकरणाबाबत भाजपा वावड्या उठवीत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

खासगीकरणविषयक बातम्या जनतेची निव्वळ दिशाभूल करणाऱ्या असून असा कोणताही प्रस्ताव कोणत्याही पातळीवर महावितरण वा राज्य शासनाच्या विचाराधीन नसल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले आहे. “भाजपसारखे राजकीय पक्ष वा काही संघटना स्वार्थी व राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा अफवा पसरवित आहेत आणि जनतेने यावर विश्वास ठेवू नये “, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“महावितरणच्या काही विभागाचे खाजगीकरण करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार व माझ्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी हे बातम्या पेरण्याचे षड्यंत्र तर रचण्यात आलेले नाही ना,अशी शंका या निमित्ताने येत आहे”,असेही ते म्हणाले.

ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी अनेक जनोपयोगी निर्णय व धोरण आखल्याने ऊर्जा विभागात निहित स्वार्थ असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. भारतीय जनता पार्टीने देशात सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाचा सपाटा लावला असून अनेक सार्वजनिक उद्योग मोडीत काढत भांडवलदारांच्या खिश्यात घातले आहे.

खासगीकरणासाठी भाजपचेच प्रयत्न

गेल्या 2014 पासून केंद्रातील भाजपा सरकारने विद्युत क्षेत्राचे खाजगीकरण करण्यासाठी 5 ते 6 वेळा विद्युत कायद्यात सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट राज्यावर लादून आडमार्गाने खासगीकरणाचा प्रयत्न ही केंद्र सरकारने करून पाहिला. मात्र ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी याला कडाडून विरोध केलेला आहे. एवढेच नव्हे तर देशातील इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्र शासनाच्या वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे.

राज्यातील महावितरणचे खासगीकरण करण्याच्या वातावरण निर्मितीसाठी भाजपने महावितरणची थकबाकी ५ वर्षात तिपटीने वाढू दिली. मात्र सत्ताबदल झाल्याने व खासगीकरणासाठी केंद्राचा दबावही राज्य झुगारत असल्याने आडमार्गाने खासगीकरणासाठी ही नवी मोहीमच भाजपने उघडली आहे,असा आरोप ही त्यांनी केला.

मागील भाजप सरकारच्या काळात महावितरणला तोट्यात आणून खाजगीकरण करण्याचा घाट भाजपने घातला होता. भाजपच्या काळात महानिर्मितीच्या नफ्यात चालणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण करण्यात आले आहे. भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ऊर्जामंत्री यांच्यावर केलेले आरोप हे राजकिय आकसापोटी केले आहेत,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तिन्ही वीज कंपन्यांना नफ्यात आणून राज्यातील जनतेला स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. राऊत हे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. शेतकरी वर्गासाठी उपयुक्त असे नवीन कृषिपंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असून कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या महावितरणला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी, सामान्य ग्राहक व कर्मचारी यांच्या हितासाठी महावितरणचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी मी वेळोवेळी खंबीर भूमिका घेतली असून भविष्यातही अशीच भूमिका घेत राहील,असे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Nitin_Raut

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नागपुर खंडणी प्रकरण : चाळीसगावच्या आणखी एकाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्फोटकांसह दोघं ताब्यात ; आयजी विशेष पथक आणि धुळे बीडीडीएसची संयुक्त कारवाई !

October 6, 2022

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 18 डिसेंबर 2025 !

December 18, 2025

मोठी बातमी : नगरपालिकांची प्रभाग रचना रद्द ; शासन आदेशानुसार नव्याने होणार रचना !

March 14, 2022

धीरेंद्र शास्त्री यांना अटक करा ; धरणगाव येथील कुणबी पाटील समाज आक्रमक !

February 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group