पंजाब (वृत्तसंस्था) भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या अटकेच्या प्रकरणात आता पंजाब (Punjab) पोलिसांविरुद्ध दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला आहे.
तजिंदरसिंग बग्गा यांच्या वडिलांनी आरोप केला आहे, की पंजाब पोलिसांनी त्यांच्या मुलाला जबरदस्तीने घरातून नेले आणि मारहाण केली. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवताना त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ताही उपस्थित होते. तजिंदर सिंग बग्गा यांनी पंजाब पोलिसांच्या एफआयआरविरोधात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्याची सुनावणी उद्या म्हणजेच होणार होती. मात्र न्यायाधीश रजेवर गेले. बग्गा यांच्या अटकेविरोधात भाजप आज दुपारी ३ वाजता आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे.
पंजाब पोलिसांनी भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांना आज अटक केली. विशेष म्हणजे, मोहाली पोलिसांनी तजिंदर सिंग बग्गाविरुद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला होता. कलम १५३-अ, ५०५ आणि ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२२ दिवशी मोहाली येथे नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे पंजाब पोलिसांनी बग्गा यांच्यावर ही कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सनी सिंग अहलुवालिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. सनी सिंग अहलुवालियाच्या तक्रारीनुसार, तजिंदर सिंग बग्गा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या धार्मिक भावना भडकावून मुख्यमंत्री केजरीवाल यांना इजा पोहोचवू शकतात आणि त्याचवेळी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.