TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा ; ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in जळगाव, मनोरंजन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कलावंतांसाठी आर्थिक तथा जीवनावश्यक वस्तूंच्या मदती संदर्भात ॲड. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व खान्देश लोककलावंतसोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. तसेच कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ॲड. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी यावेळी केले आहे.

सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व कलांचे सादरीकरण बंद झाले आहे. यामुळे या कलाप्रकारांचे सादरीकरण करुन आपली उपजिविका करणाऱ्या कलावंतांवर मात्र आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. या कलावंतांना आजवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व खान्देश लोककलावंत परिषदेतर्फे धान्य स्वरुपात मदत करण्यात आली. परंतु जिल्हाभरातील गरजू कलावंतांची संख्या पाहता ही मदत अपूरी पडत असल्याने प्रशासनाने याबाबतीत लक्ष घालून जास्तीत जास्त कलावंतांना मदत मिळावी. यासाठी निवेदन देण्यात आले.

READ ALSO

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याला लोककला सादरीकरण तसेच नाटक, नृत्य, संगीताची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. एकेकाळी जळगावच्या लोककला, नाट्य, संगीत सृष्टीने सुवर्णकाळ पाहिला आहे. जळगावातील तमाशा मंडळानी उभ्या महाराष्ट्राला आपल्या कलासादरीकरणाने वेड लावले होते. त्याचप्रमाणे वहीगायन, वासुदेव, गोंधळी सारखा दुर्मिळ प्रकार आजही जळगाव जिल्ह्यात जोपसला जात आहे. जळगावच्या नाट्यकलावंतांनी राज्यभरातील एकांकिका स्पर्धांसह विविध नाट्यस्पर्धा गाजविल्या आहेत. तसेच संगीत व नृत्य क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील कलावंतांची कामगिरी उल्लेखनीय आहे. एकंदरीतच या प्रयोगशील कलांच्या सादरीकरणावर अनेक कुटुंबाची गुजराण होत असते.

सद्यस्थितीत गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन व अन्य विविध कारणांनी लोककलांचे सादरीकरण बंद झाले आहे. त्यामुळे या प्रयोगशील कलांवर अवलंबून असणारे अनेक कलावंत व त्यांचे कुटुंबिय आर्थिक ओढगस्तीने ग्रासले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी लोककलावंत परिषद या आमच्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही या कलावंतांना मदत करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात केला आहे. परंतु शासकीय स्तरावरून अद्यापही या कलावंतांना मदत मिळालेली नाही. आजच्या या परिस्थितीत आर्थिक गर्तेत सापडलेल्या या कलावंतांना भरीव अशा आर्थिक मदतीची अपेक्षा असून, प्रशासकीय स्तरावर आपल्यापर्यंत याबाबतीत सर्वच प्रयोगशील कलांचे सादरीकरण करणाऱ्या या कलावंतांचा आवाज पोहचावा व आपल्या माध्यमातून सरकारी स्तरावर त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा, असे निवेदनात म्हंटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यासह खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ॲड. पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी आवाहन केले की, जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनीही पुढे येऊन या कलावंतांना मदत करावी. याकरिता ज्यांना कोणासही मदत करावयाची असल्यास त्यांनी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे (मोबाईल क्रमांक ८८३०४९५८२२) यांना संपर्क करावा.

कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळावी

कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमदेखील बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तनकार व त्यांना सहकार्य करणाऱ्या टाळकरी व भजनी मंडळांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना आतापर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे, मात्र कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळे यापासून वंचित आहेत. जवळपास ९० टक्के कीर्तनकारांचा उदरनिर्वाह हा कीर्तनावर अवलंबून असल्याने, शासनातर्फे कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळावी याकरितादेखील ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

रोहिणीताईंच्या आवाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रतिसाद

पत्रकारांशी बोलतांना रोहिणीताईंनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व उद्योजकांनी कलावंतांना मदत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सुनसगाव येथील सरपंच निलेश शालिक साबळे आपल्या वैयक्तिक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी रोहिणीताईंच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत कलावंतांकरिता ५ क्विंटल गहू देण्याची तयारी दर्शवून विनोद ढगे यांना संपर्क केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर ६ महिन्यांपासून अत्याचार !

October 3, 2024

हृद्यद्रावक : पंख्याचा शॉक लागून आईसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू !

April 11, 2024

पार्टीचा बेत आखला…सोबत दारू रिचवली, नंतर मित्राचा गळा आवळून केला खून !

October 31, 2023

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group