धरणगाव (प्रतिनिधी) शहरात सुरु असलेल्या कामांबाबत भाजप फक्त विरोधाला विरोध करत असल्याचे प्रतिपादन आज पालिकेतील शिवसेनेचे गटनेते विनय भावे यांनी केले. पाणी पुरवठ्याची माहिती देण्यासाठी शिवसेना आयोजित एका पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते.
पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत करण्याच्या मागणीसाठी भाजपने पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून साधारण पाच दिवसापूर्वी आंदोलन केले होते. त्यावर आज प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी विनय भावे यांनी भाजप फक्त विरोधाला विरोध करत आहे. तसेच पालकमंत्री किंवा त्यांच्या पुत्राकडे कोणतीही बेकायदा संपत्ती नसल्याचे सांगितले. यानंतर नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी गांधी उद्यानाच्या कार्यक्रमाला वडिलांच्या तब्येतीमुळे येऊ शकलो, नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच टक्केवारीचा घेत असल्याचा आरोप खोडून काढला. तर भाजपच्या तत्कालीन पाणी पुरवठा सभापती नूतन पाटील असताना त्यांनी पाणी पुरवठा का सुरळीत केला नाही?, असा सवाल नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी उपस्थित केला. दरम्यान, पाणी पुरवठ्याशी संबंधित पत्रकार परिषदेला विद्यमान पाणी पुरवठा सभापती अनुपस्थित असण्याचे कोणतेही कारण मात्र, नगराध्यक्ष श्री. चौधरी यांनी सांगितले नाही.
माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पाणी पुरवठा सध्याच्या काळात ८ ते १० नंतर देणे शक्य असल्याचे समजावून सांगितले. तसेच पेव्हर ब्लॉकचा व्यवसाय आमच्या पदाधिकाऱ्यांचा असला तरी ते फक्त गावात नव्हे तर संपूर्ण तर संपूर्ण तालुक्याला माल सप्लाय करतात, असेही सांगितले. तर अॅड. शरद माळी यांनी भाजपकडून इडीच्या बाबतीत कारवाई दिलेल्या इशाऱ्याचा समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला विजय महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, वासुदेव चौधरी,योगेश वाघ, अहमद पठाण, किरण मराठे, विलास महाजन, राजेंद्र ठाकरे, जितेंद्र कंखरे, धीरेंद्र पुरभे, बालू जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.