बोदवड (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याबद्दल आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याचा बोदवड तालुका भाजपकडून येथील आंबेडकर चौकात खडसे यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजप तालुका कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रक काढले. त्यात कुठलेच पुरावे नसतांना, राजकीय हव्यासापोटी आमदार एकनाथ खडसे यांनी ज्या अश्लील भाषेत वक्तव्य केले ते अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या अशा खोट्या आरोपांबद्दल त्यांचे मानसिक संतुलन ठिकाणावर नसून वैमनस्यातून नेहमी नेहमी अशी भाषा वापरुन वक्तव्य करत असतात. यातून त्यांचे मानसिक संतुलन ठिकाणावर नाही असे दिसून येते. अशा वक्तव्याबद्दल आमदार एकनाथ खडसे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
अशा खालच्या पातळीवर बोलणे बंद करुन आमच्या नेत्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही भाजपातर्फे तीव्र आंदोलन करू असे याची नोंद घ्यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वप्न बघणारे, मुख्यमंत्री होण्याचा एकही गुण त्यांच्यात नव्हता हे जनतेसमोर सिद्ध झाले तसेच अशी अश्लील भाषा वापरून टिका करतात. यातून त्यांचा खरा निंदनीय चेहरा समोर येतो. अशा आमदार एकनाथ खडसे यांचा आम्ही भाजपा बोदवडतर्फे जाहीर निषेध करतो.
जाहीर निषेधवेळी तालुकाध्यक्ष मधुकर राणे, जिल्हा सरचिटणीस परमेश्वर टिकारे, शहराध्यक्ष पवन जैन, पुंडलिक पाटील नगरसेवक विजय बडगुजर, नगरसेवक भरत पाटील, रूपेश गांधी, भागवत टिकारे, अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, डॉ. सुधीर पाटील, विजय पालवे, जमिल शेख, संजय अग्रवाल, महेंद्र पाटील, उमेश पाटील, अभिषेक झाबक, राहुल माळी, धनराज सुतार, विश्वासराव जवरे, संतोष चौधरी, पंकज डिके हे कार्यकर्ते उपस्थित होते.