TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशातील पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का !

जाणून घ्या..पाच पोटनिवडणुकांचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) देशात चार विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपला सर्व पाचही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. यात तृणमूल काँग्रेसने (TMC) एक लोकसभा आणि एक विधानसभेची जागा मिळवली आहे. काँग्रेसने (Congress) दोन विधानसभेच्या जागा मिळवल्या असून, राष्ट्रीय जनता दलाने (RJD) विधानसभेची एक जागा मिळवली आहे.

महाराष्ट्रासह 4 राज्यांतील लोकसभेच्या 1 व विधानसभेच्या 4 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा व बीलागंज विधानसभा मतदार संघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे. याठिकाणी तृणमूलचे शत्रुघ्न सिन्हा व बाबुल सुप्रियो विजयी झालेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा तब्बल 19 हजार मतांनी दारुण पराभव केला आहे. बिहारच्या बोचहा मतदार संघात राजदने भाजपला पिछाडीवर टाकले आहे. दहाव्या फेरीनंतर राजदचे अमर पासवान यांच्याकडे तब्बल 13 हजार मतांची आघाडी होती. छत्तीसगडच्या खैरागढ विधानसभा मतदार संघातही काँग्रेसच्या उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा काँग्रेस

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे.

बंगालमध्ये शत्रुघ्न सिन्हा अन् बाबुल सुप्रियोंची बाजी

असनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. त्यांनी भाजपच्या (BJP) उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्यावर तब्बल दोन लाखांनी आघाडी घेतली आहे. तृणमूलचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुप्रियो यांना 20 हजार 228 मतांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. भाजप तिसऱ्या स्थानी तर काँग्रेसच्या चौथ्या स्थानी आहे.

बालीगंज विधानसभा

दुसरीकडे, बंगालच्या बालीगंज विधानसभा मतदार संघात बाबुल सुप्रियो यांनी भाजप उमेदवार केया घोष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI-M)सायरा शाह यांचा पराभव केला आहे. माजी आमदार तथा राज्याचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

बिहारमध्ये तेजस्वी यादवांचा धक्का

बिहारमध्ये भाजप सत्तेत असून, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने बोचहां मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत आमदार मुसाफिर पासवान यांचे पुत्र अमरकुमार यांना तिकीट देण्याची खेळी आरजेडीने खेळली होती. त्यांना 82 हजार 562 मते मिळाली. याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा विजय

छत्तीसगडमध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसनं विजयाकडे वाटचाल केली आहे. खैरागड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार यशोदा वर्मा यांनी भाजपच्या कोमल जांघेल यांच्यावर 15 हजार 633 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या अजून तीन फेऱ्या बाकी असून, वर्मा यांच्या विजय निश्चित मानला जात आहे. जनता काँग्रेसचे छत्तीसगड (जोगी) पक्षाचे आमदार देवव्रतसिंह यांच्या मृत्यूमुळे खैरागड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत भाजपच्या जांघेल या केवळ 870 मतांनी हरल्या होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

राज्यात दंगली भडकवण्याचे कट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना संसर्गामुळे १४ जून रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

June 8, 2021

शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 20, 2021

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

January 2, 2021

नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर कारचा भीषण अपघात ; यात्रेला जाणारा तरुण ठार !

April 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group