धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्यावतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार व तहसीलदार देवरे यांना चेतावणी देऊन निवेदन देण्यात आले. तसेच शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल हे शेतकरी विरोधी सरकारने लक्षात ठेवावे. अशी चेतावणी देऊन निषेध करण्यात आला.
महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार व तहसीलदार देवरे यांना निवेदन देण्यात आले की, कोरोना महामारीमुळे शेतकरी, व्यावसायिक बेरोजगार झाले होते. त्यामुळे ते जेमतेम उपजीविका भागवत आहे. आणि महाविकास आघाडी सरकार वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत आहे. महाविकास आघाडी सरकार मधील ऊर्जामंत्री यांनी घोषित केले होते की, शेतकऱ्यांना १००% वीजबिल माफी करण्यात येईल व घरगुती वापर असलेल्या ग्राहकांना १०० युनिटवर ३०%वीजबिल माफी करू. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी न करता क्रूरपणे कोरोना काळातील थकबाकीदार शेतकरी, व्यापारी यांना कोणतीही लेखी सूचना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. हा अन्याय भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल हे शेतकरी विरोधी सरकारने लक्षात ठेवावे. त्यासाठी महावितरणला निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, शिरिष आप्पा बयास, अँड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड. वसंतराव भोलाने, पुनीलाल आप्पा महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, मधुकर रोकडे, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, कडु अप्पा बयास, सुनील चौधरी, डोंगर चौधरी, आबा पाटील, जुलाल भोई, वासुदेव महाजन, टोनी महाजन, राजू महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, किशोर माळी, रवी पाटील, शुभम चौधरी, विक्की महाजन या सर्वानी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.