जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहराचा कायापालट करण्याच्या खोट्या आश्वासनाच्या भरोशावर जनतेकडून भरघोस मते आपल्या पदरात पाडून घेतल्यानंतर भाजप पक्षाने शहरातील जनतेला पाठ दाखविले व एक प्रकारे जनतेची फसवणूक केली. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकारांमधून असे लक्षात येते की भाजप पक्षाचे नेते स्वयंघोषित संकटमोचक यांनी व यांच्या मामांनी संपूर्ण शहरातील जनतेला मामा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रकाराचा व भ्रष्टाचाराचा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पोलखोल करत जाहीर निषेध व्यक्त केला.
जळगाव शहराचा इतिहास तपासल्यानंतर लक्षात येते की, जळगाव शहरामध्ये विकास कमी व राजकारण जास्त गाजलेल आहे. राजकारण करत असताना जळगाव शहरामध्ये सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही. परंतु भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे, मग वाघुळ प्रकरण असो, अटलांटा प्रकरण असो, विमानतळ प्रकरण असो किंवा खोट्या आश्वासनाच्या भरोशावरती सत्तेत आलेल्या भाजप पक्षाचे वाटर ग्रेस कचरा घोटाळा असो, हे सर्व प्रकरणात जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून अमाप भ्रष्टाचार यामध्ये केलेला आहे.
परंतु भाजप पक्षाने या पर्यंत न थांबता सध्या संपूर्ण जळगाव शहरामध्ये अमृत योजनेचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरातील गल्ली गल्ली मधील रस्ते हे अमृत योजनेसाठी खोदले. त्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकली व या संपूर्ण प्रकारामुळे रस्त्यांची आधीच वाईट अवस्था असताना संपूर्ण जळगाव शहर हे धुळीमय झालेला आहे. परंतु एक सुज्ञ जळगावकर म्हणून विचार केला असता, जर भविष्यामध्ये चांगला विकास हवा असेल तर थोडा त्रास ही सहन करायला जळगावकर कटिबद्ध आहे. परंतु भाजप पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना संपूर्ण शहरांमध्ये या पद्धतीचं काम सुरू आहे त्याची चौकशी केली असता आपणास दिसून येते की, सध्या शहरांमध्ये भुयारी गटार व ड्रेनेजचे काम सुरू आहे. परंतु भुयारी गटारी करीत असताना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईप पासून ते ड्रेनेजचे बांधकाम करणार्या विटांपर्यंत अतिशय निकृष्ट दर्जाचे असे सर्व मटेरियल वापरले जात आहे.
भुयारी गटारी मध्ये महत्त्वाचा विषय असणारे ड्रेनेज चेंबर याचं बांधकाम करीत असताना त्यामध्ये कच्च्या पद्धतीच्या चुना मिसळलेल्या विटांचा वापर करून वाळुच्या ऐवजी कच चा वापर करून हे ट्रेनचं बांधकाम सध्या शहरांमध्ये सुरू आहे. तसेच बांधकाम झालेल्या चेंबर वर साध पाणी सुध्दा दिलेलं नसल्याच दिसुन येत आहे, याचा अर्थ की हे बांधकाम इतकं निकृष्ट दर्जाचे असणार आहे की हे चेंबर भविष्यामध्ये केव्हाही ढासळून जाणार आहे व याचा संपूर्ण त्रास हा जळगाव शहरातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकारांमधून असे लक्षात येते की भाजप पक्षाचे नेते स्वयंघोषित संकटमोचक यांनी व यांच्या मामांनी संपूर्ण शहरातील जनतेला मामा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे.
या संपूर्ण प्रकारात भाजप पक्षाचे सत्ताधारी नगरसेवकांसह प्रशासनाचा अधिकारी असलेले आयुक्त हे देखील या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले दिसून येत आहे. चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून, त्याच पद्धतीने वाळु ऐवजी कचचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये हे संपूर्ण शहरातील काम करण्याचा प्रयत्न व जास्तीत जास्त पैसा खाण्याचा प्रयत्न भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला आहे.
या संपूर्ण प्रकाराचा व भ्रष्टाचाराचा जळगाव जिल्हा एन एस यू आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पोलखोल करत जाहीर निषेध व्यक्त केला व भविष्यामध्ये या संपूर्ण प्रकाराची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे फोटोसह सर्व पुराव्यानिशी सादर केली जाणार आहे व या संपूर्ण प्रकारात जबाबदार असलेले भाजप पक्षाच्या नेत्यांचा सर्व नगरसेवक आयुक्त यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकारची देखील मागणी करण्यात येणार आहे.