TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपचे संकटमोचक व त्यांच्या मामांनी शहराला बनवलं मामा…! – देवेंद्र मराठेंची खोचक टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in अर्थ, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहराचा कायापालट करण्याच्या खोट्या आश्वासनाच्या भरोशावर जनतेकडून भरघोस मते आपल्या पदरात पाडून घेतल्यानंतर भाजप पक्षाने शहरातील जनतेला पाठ दाखविले व एक प्रकारे जनतेची फसवणूक केली. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकारांमधून असे लक्षात येते की भाजप पक्षाचे नेते स्वयंघोषित संकटमोचक यांनी व यांच्या मामांनी संपूर्ण शहरातील जनतेला मामा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रकाराचा व भ्रष्टाचाराचा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पोलखोल करत जाहीर निषेध व्यक्त केला.

जळगाव शहराचा इतिहास तपासल्यानंतर लक्षात येते की, जळगाव शहरामध्ये विकास कमी व राजकारण जास्त गाजलेल आहे. राजकारण करत असताना जळगाव शहरामध्ये सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही. परंतु भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे, मग वाघुळ प्रकरण असो, अटलांटा प्रकरण असो, विमानतळ प्रकरण असो किंवा खोट्या आश्वासनाच्या भरोशावरती सत्तेत आलेल्या भाजप पक्षाचे वाटर ग्रेस कचरा घोटाळा असो, हे सर्व प्रकरणात जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून अमाप भ्रष्टाचार यामध्ये केलेला आहे.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

परंतु भाजप पक्षाने या पर्यंत न थांबता सध्या संपूर्ण जळगाव शहरामध्ये अमृत योजनेचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरातील गल्ली गल्ली मधील रस्ते हे अमृत योजनेसाठी खोदले. त्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकली व या संपूर्ण प्रकारामुळे रस्त्यांची आधीच वाईट अवस्था असताना संपूर्ण जळगाव शहर हे धुळीमय झालेला आहे. परंतु एक सुज्ञ जळगावकर म्हणून विचार केला असता, जर भविष्यामध्ये चांगला विकास हवा असेल तर थोडा त्रास ही सहन करायला जळगावकर कटिबद्ध आहे. परंतु भाजप पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना संपूर्ण शहरांमध्ये या पद्धतीचं काम सुरू आहे त्याची चौकशी केली असता आपणास दिसून येते की, सध्या शहरांमध्ये भुयारी गटार व ड्रेनेजचे काम सुरू आहे. परंतु भुयारी गटारी करीत असताना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईप पासून ते ड्रेनेजचे बांधकाम करणार्‍या विटांपर्यंत अतिशय निकृष्ट दर्जाचे असे सर्व मटेरियल वापरले जात आहे.

भुयारी गटारी मध्ये महत्त्वाचा विषय असणारे ड्रेनेज चेंबर याचं बांधकाम करीत असताना त्यामध्ये कच्च्या पद्धतीच्या चुना मिसळलेल्या विटांचा वापर करून वाळुच्या ऐवजी कच चा वापर करून हे ट्रेनचं बांधकाम सध्या शहरांमध्ये सुरू आहे. तसेच बांधकाम झालेल्या चेंबर वर साध पाणी सुध्दा दिलेलं नसल्याच दिसुन येत आहे, याचा अर्थ की हे बांधकाम इतकं निकृष्ट दर्जाचे असणार आहे की हे चेंबर भविष्यामध्ये केव्हाही ढासळून जाणार आहे व याचा संपूर्ण त्रास हा जळगाव शहरातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकारांमधून असे लक्षात येते की भाजप पक्षाचे नेते स्वयंघोषित संकटमोचक यांनी व यांच्या मामांनी संपूर्ण शहरातील जनतेला मामा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे.

या संपूर्ण प्रकारात भाजप पक्षाचे सत्ताधारी नगरसेवकांसह प्रशासनाचा अधिकारी असलेले आयुक्त हे देखील या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले दिसून येत आहे. चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून, त्याच पद्धतीने वाळु ऐवजी कचचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये हे संपूर्ण शहरातील काम करण्याचा प्रयत्न व जास्तीत जास्त पैसा खाण्याचा प्रयत्न भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेला आहे.

या संपूर्ण प्रकाराचा व भ्रष्टाचाराचा जळगाव जिल्हा एन एस यू आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पोलखोल करत जाहीर निषेध व्यक्त केला व भविष्यामध्ये या संपूर्ण प्रकाराची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे फोटोसह सर्व पुराव्यानिशी सादर केली जाणार आहे व या संपूर्ण प्रकारात जबाबदार असलेले भाजप पक्षाच्या नेत्यांचा सर्व नगरसेवक आयुक्त यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकारची देखील मागणी करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले महाराष्ट्राचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! पोलिओ लस देताना बाळाच्या पोटात गेला प्लॉस्टिकचा तुकडा

February 2, 2021

धरणगाव राष्ट्रवादीची शनिवारी महत्वाची बैठक ; कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन !

November 17, 2022

चोपडा : झोका खेळताना तेरा वर्षीय बालकासोबत घडलं भयंकर !

May 18, 2024

क्रूरतेचा कळस ! १८ वर्षाच्या मुलीवर गँगरेप करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group