बोदवड (प्रतिनिधी) येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याअंतर्गत आज बोदवड येथील जिजाऊ बालोद्यान येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उदघाटन तहसीलदार प्रथमेश घोलप व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले. रक्तदान केलेल्या दात्यांना समितीतर्फे शिवाजी कोण होता ही पुस्तिका भेट देण्यात आली. या शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे, तांत्रिक सहाय्यक लक्ष्मीकांत त्रिपाठी, तंत्रज्ञ रोहिणी देवकर, सुनील अनपट, अधीक्षक परिचर अरुण चौधरी, जनसंपर्क अधिकारी निलेश पवार, परिचारिका संगीता वंजारी, परिचारक प्रभाकर पाटील, चालक सुभाष सोनवणे यांनी रक्तसंकलन काम केले. समिति अध्यक्ष संदीप मिलांदे, उपाध्यक्ष रामधन माळी, प्रमोद धामोडे, सूरज पाटील, शांताराम कोळी, संजय पाटील, निवृत्ती ढोले, गोपाळ पाटील, अनंता वाघ, निलेश ठाकरे व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.