नशिराबाद (प्रतिनिधी) राज्यात रक्तसाठा हा रक्तपेढ्यांमध्ये कमी प्रमाणात असून जास्तीत जास्त सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संघटनांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आव्हान कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असता त्याचे प्रसाद जळगाव येथेसुद्धा उमटले व जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरदारीने शिबिराचे असयोजन केले.
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालय आहे. कोरोना काळात या हॉस्पिटल ला कोविड व नॉन कोविंड असे रुग्णांची सेवा करण्यात आली व सुरू आहे. अशा वेळी या रुग्णालयात अंदाजे वर्षाला २५०० ते ३००० रक्ताच्या बाटल्यांची मागणी असते म्हणून या हॉस्पिटलच्या रक्तपेढीला रक्त दान शिबिरा द्वारे रक्त दान करण्याचे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केले आहे. जळगाव जिल्हा मणियार बिरादरी च्या शेख यांच्या आव्हानास नशिराबाद येथील सर्व बिरादारीच्या तरुणांनी प्रतिसाद देत या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदान करून डॉक्टर उल्लास पाटील रुग्णालय रक्तपेढीस मदत करण्याचे निश्चय केलेला आहे.
रक्त दानाचे आवाहन
६ डिसेंबर रविवार रोजी सकाळी १० वाजेपासून नाईक वाडा, जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक १, नशिराबाद येथे होत असलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन सहकार्य असे आव्हान फारुक शेख, बरकत अली सैयद, अय्युब मेंबर, आसिफ मुबललीग, रियाज शेख, इस्माईल शेख, अब्बू शेख, आदींनी केले आहे.