धरणगाव (प्रतिनिधी) सद्यपरिस्थितीमध्य रक्तदान हा ऐच्छिक विषय राहिलेला नसून आवश्यक विषय बनला आहे. सद्या कोरोनाच्या भीषण काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तपेढींमधील रक्तसाठा कमी पडू लागला आहे. आपले रक्त देऊन आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. याच सेवाभावनेतून हनुमान जयंतीनिमित्त रा. स्व. संघ महाविद्यालय विभाग व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेतर्फेत दि. २८ एप्रिल २०२१ रोजी विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय याठिकाणी रक्तदान शिबिर पार पाडण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मोहन हिरालाल चौधरी संघ चालक धरणगाव तालुका, देवेंद्र पुंडलिक अत्तरदे रा. स्व. संघ जिल्हा सहकार्यवाह, किशोर चौधरी वनवासी कल्याण आश्रम, दिनेश पाटील तालुका कार्यवाह, सुनिल शाह तालुका सह कार्यवाह, शिवाजी चौधरी शहर कार्यवाह, देवेंद्र पाटील शहर सहकार्यवाह, शहरातील चार्टड अकाउंटंट भुषण मेहेर, प्रतिष्ठीत व्यापारी चेतन कोठारी, रा. स्व. संघ महाविद्यालय प्रमुख दिपक मराठे, अभाविप शहरमंत्री इच्छेश रविंद्र काबरा आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईला अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात २ भगिनींचा समावेश आहे. यावेळी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र टीम ने रक्तदान प्रसंगी काम पाहिले. सामान्य जनतेस रक्त म्हणून मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रा. स्व. संघ व अभाविप च्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.