TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2024
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव प्रायोजित आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आयोजित कै. ग.वी. अभ्यंकर मराठी नाट्यगीत व कै. शांताबाई अभ्यंकर मराठी भावगीत स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. प्रा. एस. टी. भुकन, प्रमुख अतिथी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक मा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, विद्यापीठ नियुक्त स्पर्धेचे निरीक्षक खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील डॉ. संजीव साळवे, भोळे महाविद्यालय भुसावल येथील प्रा. आर. डी. भोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील, परीक्षक डॉ. अमोघ अमळनेर, मा. किरण सोहळे, विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

विद्यापीठ स्तरावर मराठी नाट्यगीत व भावगीत स्पर्धा विद्यार्थी विकास विभागाच्या मार्फत दरवर्षी कै. अभ्यंकर साहेब आणि शांताबाई अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांच्या गायन कलेला विकसित करण्यासाठी आयोजित केली जाते. कार्यक्रमाला जमलेल्या श्रोत्यांना बघून तानसेन होण्यापेक्षा सध्याच्या काळामध्ये कानसेन होण्याची आवश्यकता आहे कारण चांगला वक्ता किंवा गायक होण्यासाठी चांगला श्रोता असणे आवश्यक आहे असे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. भुकन यांनी सांगितले. उत्तम श्रोत्यांमधूनच उत्तम गायक अथवा वक्ता निर्माण होतो असे विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती देऊन कळत नकळत अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना कळत असतात असे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी केले.

READ ALSO

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

सदर स्पर्धेच्या समारोपप्रसंगी परीक्षक डॉ. अमोघ जोशी आणि किरण सोहळे सर यांनी नाट्यगीत व भावगीत सादरीकरण करत असताना भाव व्यक्त होणे अधिक महत्त्वाचे असते खरच त्या गाण्याला अर्थ प्राप्त होतो असे सांगितले. सोबतच नाट्यगीत म्हणजे काय आणि भावगीत म्हणजे काय हे सोदाहरण स्पष्ट केले एवढेच नव्हे तर दोघांनीही नाट्यगीत आणि भावगीत यांचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली. तद्वतच खडसे महाविद्यालयातील विद्यापीठ नियुक्त निरीक्षक डॉ. संजीव साळवे यांनी दिवसभर सुरू असलेल्या नाट्यगीत व भावगीत स्पर्धेच्या आयोजन व नियोजन संदर्भातील सकारात्मक मनोगत व्यक्त केलं. समारोप समारंभाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी विकास कक्षाचे अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी सदर स्पर्धेचा मार्गदर्शन करून निकाल जाहीर केला त्यात नाट्यगीत स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रगती किशोर तांबट नहाटा महाविद्यालय भुसावळ प्रथम, सेजल रवींद्र बोरकर गरुड महाविद्यालय शेंदुर्णी द्वितीय तर माधुरी संतोष महाजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा, जळगाव तृतीय यांनी क्रमांक पटकाविला. तसेच मराठी भावगीत या कला प्रकारामध्ये अनुक्रमे प्रगती किशोर तांबट महाविद्यालय भुसावळ प्रथम, माधुरी संतोष महाजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा जळगाव द्वितीय तर चेतना प्रवीण देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल यांनी पारितोषिके प्राप्त केलेत.

विद्यापीठ परिक्षेत्रातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी सदर दोन्ही कला प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदविला. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे आणि प्रस्तावना विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी केली. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख प्रा. सौ. वैशाली संसारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. युवराज आठवले, प्रा. अजित पाटील, डॉ. अमोल वाघमोडे, डॉ. ईश्वर म्हस्लेकर, डॉ. वंदना नंदवे, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. रूपाली तायडे, प्रा. कंचन दमाडे, डॉ. अनिल बारी, प्रा. नितेश सावदेकर, प्रा. भूषण धनजे, राजू मोपारी, अतुल पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

October 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे चोपड्यात पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही ; संजय राऊतांचा पलटवार

May 2, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार !

April 24, 2024

भंडारा दुर्घटना : सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भावनिकतेचे अनोखे दर्शन

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group