TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १७ ते २४ सप्टेंबर !

जाणून घ्या...तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : स्वत:हून पुढाकार घेऊन केलेल्या कामात यश मिळेल. इतरांचेही सहकार्य मिळेल. भावनिक गोष्टीत गुंतून राहावेसे वाटणार नाही. सडेतोड भूमिका राहील. व्यवसायिक हालचाली वेगात सुरू होतील. अनेक क्षेत्रात सरस राहाल. नोकरदार वर्गाची कामगिरी उंचावेल. मात्र वरिष्ठांशी जपूनच वागावे लागेल. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात वादविवाद टाळा. घरगुती वातावरण ठीक राहील. भावंडाशी गोडीचा संवाद राहील.

वृषभ : दरवेळी आमका दिवस चांगला, तमका दिवस वाईट असा जो कालावधी होता तो सध्या नाही. सगळे दिवस अनुकूल असतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही. स्वत:च्या मर्जीनेच काही निर्णय घ्याल. आणि ते यशस्वीही करून दाखवाल. या संधीचा जरूर फायदा घ्या. स्वकर्तृत्व सिद्ध होईल. व्यवसायिक उत्पन्न वाढेल. ग्राहकवर्ग आकर्षित होईल. इतरांची देणी वेळेत फेडाल. नोकरदार वर्गाला केलेल्या कामाची पोचपावती मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक मिळेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : एखाद्या व्यक्तीकडून घेतलेले मार्गदर्शन चुकीचे की बरोबर हे बघत बसू नका. तुम्हाला योग्य वाटेल तोच निर्णय घ्या. तो अगदी बरोबर असेल. व्यवसायात संधी उपलब्ध होईल. या संधीचा पुरेपूर वापर करून घ्या. व्यापारीवर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचे आराखडे तयार करावे लागतील. आर्थिकदृष्टय़ा योग्य परतावा मिळेल. सामाजिक बांधिलकी जपाल. नातेवाईकांसोबत कार्यक्रमाचे व्यवस्थापन कराल.

कर्क : आपली कोणतीही व्यथा इतरांसमोर मांडताना विचार करा. कारण ती व्यक्ती शांतपणे ऐकून घेईल. वाईट वाटले असेही म्हणेल, पण इतरांना तीच गोष्ट हसत सांगेल हे मात्र विसरू नका. या गोष्टीचा मनस्ताप होऊ शकतो. तेव्हा अडीच दिवसाचा कालावधी फक्त पुढे ढकलण्याचे काम करा. बाकी दिवस चांगले जातील. व्यावसायिकदृष्टय़ा झुकते माप घ्यावे लागेल. कर्ज योजना न स्वीकारलेल्या चांगल्या.

सिंह : इतरांच्या भरवशावर कामे करणे त्रासाचे ठरेल. इतरांना दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मात्र हा अडीच दिवसांचा कालावधी सोडल्यास पुढे कामाची गती मात्र निश्चितच वाढेल. व्यवसायिकदृष्टय़ा भागीदारीचा करार पुढे ढकला. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या आदेशानुसार नियमावलींचे पालन करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. राजकीय क्षेत्रात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल.

कन्या : एखादी गोष्ट पटली नाही व त्यावर प्रतिक्रिया दिलीत तर स्वत:हून एखादी गोष्ट अंगलट ओढून घेण्यासारखे आहे. तेव्हा हे दोन दिवस ‘आरे ला कारे’ करूच नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यापारीवर्गाने बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज घ्यावा. त्यानुसार मालाची खरेदी-विक्री करा. त्यामुळे नुकसान होणार नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून महत्त्वाचे काम सोपवले जाईल. आणि त्या कामासाठी तुमची धावपळ वाढेल. विचारपूर्वक खर्च करा.

तूळ : सरळ मार्गी वाटचाल यश मिळवून देईल. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. आतापर्यंत जी उधारी होती ती वेळेत वसूल होईल. त्यामुळे व्यवसायात स्थिरता आलेल्याचे समाधान वाटेल. नोकरदार वर्गासाठी आशावादी दृष्टिकोन राहील. आर्थिक सफलता मिळेल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. नव्या ओळखीचे नात्यात रूपांतर होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदार खूश असेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल.

वृश्चिक : वादविवाद टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यावसायिकदृष्टय़ा थकबाकी जमा करताना अरेरावी करून चालणार नाही. त्यासाठी धीर धरावा लागेल. सध्या मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला असेल. परिस्थिती समाधानकारक राहील. आर्थिकदृष्टय़ा अनावश्यक खर्च टाळा. राजकीय क्षेत्रातील सूत्रे हातात येतील. शेजाऱ्यांच्या कोणत्याही वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. नातेवाईकांशी संवाद जेवढय़ास तेवढा ठेवा.

धनू : मागचे काही दिवस त्रासाचे व पळापळीचे गेलेले विसरू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवायला शिका. हे दिवस ताण-तणावाचे जरी असले तरी पर्यायी मार्ग मिळत राहील. बाकी दिवस चांगले जातील. व्यावसायिक परिस्थिती चांगली असेल. नेहमीपेक्षा फायद्याचे प्रमाण जास्त राहील. उत्पादन वाढवणे शक्य होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी होणारे बदल कमी परिश्रमाचे असतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक घडी बसू लागेल. सामाजिक क्षेत्रात अनेकांशी मैत्रीचे संबंध जुळतील. कौटुंबिक नाराजी वेळीच दूर करा.

मकर : जिभेवर ताबा ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता साधा. बेकायदेशीर गोष्टींमध्ये अडकू नका. नियमांचे पालन करा. ज्या ठिकाणी वादाचा प्रसंग येईल अशा ठिकाणी माघार घेतलेली केव्हाही चांगली. व्यक्ती जवळची असो किंवा लांबची संवाद मात्र जपून करा. हे मात्र नक्कीच लक्षात ठेवा. व्यावसायिकदृष्टय़ा परिस्थिती जेमतेम राहील. त्यासाठी विनाकारण गुंतवणूक वाढवू नका. जे आहे त्यात समाधान माना. नोकरदार वर्गाचे कामकाज व्यस्त राहील. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे कल राहू द्या.

कुंभ : क्रोधावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात कोणतीही गुंतवणूक करताना संभ्रमावस्था निर्माण होईल. मात्र या संभ्रमावस्थेतून बाहेर पडा. सध्या महत्त्वाचे करार न केलेले चांगले. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिक बाबी जपून हाताळा.

मीन : दिनांक २३, २४ रोजी ठरवून शांत राहायचे ठरवले तरीसुद्धा तसे होणार नाही. अशा प्रसंगात बोलण्यावरचा ताबा सोडू नका. या बोलण्याचा समोरच्यालाही व तुम्हालाही त्रास होऊ शकतो. इतरांच्या भावनांचा आदर करा. तेव्हा हे दोन दिवस शांततेतच घ्या. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल आणि ती तुमच्या आवडीची असेल. आर्थिकदृष्टय़ा खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

खळबळजनक : 60 विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल ; 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

July 1, 2021

बापरे ! डॉक्टरचं काळं कृत्य समोर ; निघाला ९४ मुलांचा बाप

May 14, 2022

जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराच्या दुसऱ्या टप्प्यातील नाव नोंदणीला सुरुवात !

July 22, 2024

महापुरुषांच्या बाबत बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बोदवड येथे सर्वपक्षीय रास्ता रोको !

December 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group