जळगाव (प्रतिनिधी) राज्यात सर्वदुर खेड्यापाड्यांमधील आणि शहरांमध्ये पसरलेल्या बोगस डॉक्टरांवर चौकशी होवून कार्यवाही करावी असे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले असल्याने जि.पच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्याधिकाऱ्यांना दिले असुन अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहे.
जिल्ह्यात ग्रामिण भागात व आदीवासी दुर्गम भागात ‘बोगस’ खासगी डॉक्टर सेवा बजावत असल्याच्या तक्रारी आहे. आरोग्य विभागाकडे देखील अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यातच आता आरोग्य विभागाचे उपसंचालक यांनी दि.६ जुन रोजी राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्याधिकारी यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा आरोग्याधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्याधिकारींना पत्र पाठवून १५ दिवसात बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाई करावी तसा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे ‘बोगस मुन्नाभाई’ आता रडावर आले असल्याचे देखील मानले जात आहे.
जिल्हयात अनेक ठिकाणी मान्यता प्राप्त डॉक्टर प्रॅक्टीस करत असल्याने त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे डॉक्टर आता रडारवर आले असल्याचे मानले जात आहे.
डॉक्टर असोसिएशनचे पत्र
पाथरी डॉक्टर असोसीएशनने शासनाकडे राज्यात भोंदु डॉक्टर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असुन शहरी व ग्रामिण भागात अनाधिकृत रित्या वैदयकिय व्यवसाय करणारे खासमी वैदयकीय व्यवसायीकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ग्रामिण व शहरी भागात अनाधिकृत वैदयकिय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर समिती असते. जिल्हयातील सर्व बीडीओ व तालुका वैदयकिय अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करून कारवाईचे आदेश दिले आहे.
-डॉ. सचिन भायेकर,
जिल्हा आरोग्याधिकारी, जि.प. जळगाव