ठाणे (वृत्तसंस्था) ठाण्यातील एका शाळेच्या मेल आयडीवर शाळा (school), महाविद्यालये (collage) आणि रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. डोंबिवलीजवळील निळजे उसरघर गावातील ५० मुलांनी मिळून एक संघटना काढली आहे. “आमची हिंदूंची जिहादी संघटना” असल्याचा मेलमध्ये दावा या तरुणांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका शाळेला ईमेल पाठवून धमकी देण्यात आली आहे. २१ तारखेला हा ईमेल आला आहे. डोंबिवलीजवळील निळजे उसरघर गावातील ५० मुलांनी मिळून एक संघटना काढली आहे. “आमची हिंदूंची जिहादी संघटना” असल्याचा मेलमध्ये दावा या तरुणांनी केला आहे. ‘सर्वत्र शाळा कॉलेज बंद करा, भारतीय शिक्षण संस्था चुकीची आहे. सर्वत्र फक्त मदरशातून शिक्षण दिले पाहिजे. जर शाळा, कॉलेज बंद केले नाही तर कुर्बानी आणि धमाका सुरू होईल अशी धमकी देण्यात आली आहे. laskar29laskar22@pratonmail.com या इमेल आयडीवरुन धमकी देण्यात आली, असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा ईमेल कुणी आणि कुठून पाठवला याचा तपास पोलीस करत आहे.