धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जळगाव रोडवर महाविर कॉटन जिनिंगमधून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून २५ क्विंटल कापसाची धाडसी चोरी केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव रोडवर महाविर कॉटन जिनिंगमध्ये कापूस खरेदी विक्री केंद्र असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस साठा आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भींत फोडून सुमारे अडीच लाख रूपये किंमतीचा २५ क्विंटल कापूस चोरून नेला. याबाबत मालक सुभाष काशिनाथ पाटील याचा मुलगा देवा पाटील यांनी धरणगाव पोलीसांना माहिती कळविली. सपोनि श्री. आहिरे, पीएसआय अमोल गुंजाळ, विनोद संदानशिव गजानन पाटील, संदीप पाटील, जितेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल नव्हता.